एक्स्प्लोर
दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मद्यधुंद पोलिस शिपायाचा भर चौकात धिंगाणा
दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील अवैध दारुविक्रीची चर्चा सुरु असतानाच त्यावर कारवाई करणाऱ्या पोलिस कर्माचाऱ्यानेच दारु पिऊन धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे.
वर्धा : दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात एका पोलिस कर्मचाऱ्यानेच दारुच्या नशेत भर चौकात धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्याच्या आष्टी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या संदीप खंडारे नामक शिपायाने तळेगाव येथील उड्डाणपुलाखालील चौकात धिंगाणा घालत नागरिकांशी अरेरावी केली. या घटनेनंतर पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.
वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. असं असतानाही जिल्ह्यातील अवैध दारुविक्रीबद्दल सर्वांना कल्पना आहे. जिल्ह्यात दारु विकताना, प्राशन करतानाचे अनेक गुन्हे नोंद होतात. मात्र दारुबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यानेच दारु पिऊन गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. तळेगाव येथील उड्डाणपुलाखालील चौकात धिंगाणा घालत असताना पोलिस कर्मचारी संदीप खंडारे यास नागरिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने नागरिकांशी अरेरावी केली. काही जणांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यावेळी काहींनी या घटनेचा व्हिडीओही काढला.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून संदीप खंडारेला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी केली. तळेगाव पोलिस ठाण्यात त्याच्यावर दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात 70 लाखांच्या दारुवर रोलर फिरवला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement