एक्स्प्लोर
Advertisement
मंत्रिगटाबद्दल कल्पनाच नाही, रावतेंचा सरकारला घरचा आहेर
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या मंत्रिगटाची आपल्याला कल्पनाच नसल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपल्याला अंधार ठेवल्याचं रावते म्हणाले. यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी आपले नियोजित दौरे रद्द करुन आपल्या निवासस्थानी शासकीय कामकाज केले. यावेळी भाजपच्या मंत्र्यांसोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचाही मंत्रिगटात समावेश केला. हा मंत्रिगट शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. मात्र या गटाबद्दल आपल्याला माहितीच नसल्याचं गौप्यस्फोट दिवाकर रावतेंनी केला.
मंत्रिगटाची स्थापना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी आणि इतर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे या समितीचे प्रमुख असतील.
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते समितीचे सदस्य असणार आहेत. उच्चस्तरीय मंत्रिगटानं सुकाणू समितीला चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. तर सुकाणू समितीच्या सदस्यांनीही सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement