एक्स्प्लोर

'प्रोबेस कंपनीमधील स्फोट बॉयलरमुळे नाही', अग्निशमन दलाची माहिती

मुंबई: डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीमधील भीषण स्फोटासंदर्भात आता नवी माहिती समोर आली आहे. प्रोबेस कंपनीमधील स्फोट बॉयलरमध्ये झाला नव्हता. अशी माहिती एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली आहे. कंपनीच्या केमिकल रिअॅक्टरमध्ये हा स्फोट झाल्याचं समजतं आहे. कंपनीत बॉयलरच नसल्याची कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आहे.   या स्फोटातील मृतांची संख्या 12वर जाऊन पोहोचली आहे. आज सकाळी स्थानिक नागरिकांना येथे एक अनोळखी मृतेदह आढळून आला आहे.   या स्फोटातील मृतांमध्ये कंपनीचे मालक विश्वास वाकटकर यांची दोन मुलं आणि सुनेचा समावेश आहे. स्फोटात सुमित वाकटकर, नंदन वाकटकर आणि सुमितची पत्नी स्नेहल वाकटकर यांचा मृत्यू झाला आहे.   नंदन वाकटकर हे कंपनीच्या संचालक पदावर कार्यरत होते, तर सुमित वाकटकर मॅनेजर पदाची जबाबदारी सांभाळत होते. या दोघांच्याही मृतदेहाची ओळख पटली असून, सुमित यांची पत्नी स्नेहल यांचाही या स्फोटात मृत्यू झाला आहे. आज सकाळी जो मृतदेह सापडला तो स्नेहल यांचा असल्याचं स्पष्ट झालं आहे.   या स्फोटात कंपनीचे मालक विश्वास वाकटकर हे सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.   प्रोबेस कंपनीमधील स्फोट बॉयलरमुळे नाही', अग्निशमन दलाची माहिती   तिकडे प्रोबेस कंपनीचे मालक विश्वास वाकटकर यांच्या कुटुंबीयांचा पत्ता लागत नव्हता. मात्र विश्वास वाकटकर हे रुग्णालयात असल्याचं आता समोर आलं आहे. स्फोटापूर्वी वाकटकर कुटुंब कंपनीत असल्याचं सांगण्यात आलं.   दरम्यान आज वाकटकर यांच्या परिवारातील इतर सदस्य आणि नातेवाईकांनी घटनास्थळी भेट दिली. प्रोबेस कंपनीमधील स्फोट बॉयलरमुळे नाही', अग्निशमन दलाची माहिती स्फोटाची खरी तीव्रता   डोंबिवलीत झालेल्या स्फोटाची तीव्रता किती भीषण होती, हे आज सकाळी खऱ्याअर्थानं समोर आलं. कारण ज्या ठिकाणी स्फोट झाला, तिथे सुमारे 10 फूट खोल आणि किमान 40 फूट रुंद खड्डा पडला आहे.   काल दुपारपासून सुरु असलेल्या बचावकार्यामध्ये ढिगारा हटवण्यात आला. आणि त्यानंतर स्फोटाचं रौद्र रुप समोर आलं आहे. इतकंच नाही तर ब्रोमेस कंपनीला खेटून उभ्या असलेल्या इमारतींचीही काय अवस्था झाली आहे. हेही आता समोर आलं आहे.   भीषण स्फोट सीसीटीव्हीत कैद   ज्या स्फोटानं काल संपूर्ण डोंबिवली हादरली, त्या स्फोटाची भीषणता परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं कैद केली. ते सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं.   डोंबिवली एमआयडीसीतल्या प्रोबेस कंपनीत झालेला स्फोट एवढा भीषण होता की फक्त आवाजानंच आजूबाजूच्या दुकानाच्या काचा फुटल्या. स्फोटाचा आवाज होताच लोक घराबाहेर पडण्यासाठी कशी धावपळ करतायत, याची दृश्यही सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.   प्रोबेस कंपनीपासून साधारण किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या दुकानातली ही दृश्य आहेत. बऱ्याच ठिकाणी काचाच नाही तर काही दुकानांचं अक्षरशः सिलिंग देखील कोसळलं आहे. प्रोबेस कंपनीमधील स्फोट बॉयलरमुळे नाही', अग्निशमन दलाची माहिती भीषण स्फोटाने डोंबिवली हादरली   डोंबिवली एमआयडीसीत गुरुवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास झालेल्या स्फोटात मृतांचा आकडा सातवर पोहचला आहे. तर १४० जण जखमी झाले आहेत. डोंबवली एमआयडीसीतल्या प्रोबेस एन्टरप्रायजेस या केमिकल बनवणाऱ्या कंपनीत केमिकल रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला.   स्फोट इतका भीषण होता की ५ किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरुन गेला. परिसरातल्या इमारतींच्या, गाड्यांच्या काचा फुटल्या. टपऱ्यांवरील पत्रे उडाले, तर शेजारील इतर केमिकल कंपन्याही उद्ध्वस्त झाल्या.   प्रोबसेच्या शेजारीही केमिकल कंपन्या असल्याने आग पसरत गेली. त्यामुळे लागलीच हा परिसर रिकामा करण्यात आला. तसंच इथला वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला. प्रोबेस कंपनीमधील स्फोट बॉयलरमुळे नाही', अग्निशमन दलाची माहिती या स्फोटानं प्रोबेस एन्टरप्रायजेसची 3 मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालीही अनेक कर्मचारी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बॉयलरमधल्या स्फोटामागचं नेमकं कारणं अद्याप समोर आलेलं नाही.   स्फोटातल्या जखमींवर डोंबिवलीतल्या विविध खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.   संबंधित बातम्या

EXCLUSIVE : असा घडला स्फोट! डोंबिवली स्फोटाचं सीसीटीव्ही फूटेज

केमिकल कंपन्या डोंबिवलीतून हटवणार?

डोंबिवलीत केमिकल कंपनीत स्फोट, चौघांचा मृत्यू

PHOTO: डोंबिवलीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट, धूर आणि काचांचा खच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Surya Grahan 2024 : उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
Embed widget