एक्स्प्लोर
बीड : डॉक्टरांकडून विद्यार्थ्याच्या भविष्याला 'जीवदान'
बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचीही अशीच परिस्थिती झाली होती. मात्र डॉक्टरांच्या सामाजिक जाणीवेमुळे या विद्यार्थ्याच्या स्वप्नाला बळ मिळालं.
पुणे/बीड : 'नीट'सारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये चांगले गुण घेऊनही केवळ आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना आवडत्या अभ्यासक्रमापासून दूर रहावं लागतं. बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचीही अशीच परिस्थिती झाली होती. मात्र डॉक्टरांच्या सामाजिक जाणीवेमुळे या विद्यार्थ्याच्या स्वप्नाला बळ मिळालं.
27 जुलैला MBBS साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची निवड यादी जाहीर झाली. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिकलेल्या संतोष चाटे या विद्यार्थ्याने मुंबईतील नामांकीत कुपर शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. त्याने नीटमध्ये 534 गुण मिळवले होते. मात्र प्रवेश शुल्क, वसतीगृह आणि मेसच्या पैशांची मोठी अडचण झाली. मात्र डॉक्टरांनी जपलेल्या सामाजिक जाणीवेमुळे कुडाच्या घरात राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्याला आवडत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणं शक्य झालं.
डॉक्टरांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन 50 हजार रुपये जमा
वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परिस्थितीशी संघर्ष करत असलेल्या संतोषच्या मदतीलाही डॉक्टर धावून आले. अंबाजोगाईतील डॉक्टरांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केलेल्या एका आवाहनामुळे संतोषचं स्वप्न पूर्ण झालं. या ग्रुपमधील डॉक्टरांनी संतोषसाठी 50 हजार रुपयांचं अर्थसहाय्य उभं केलं.
अंबाजोगाई येथील शासकीय महाविद्यालयातील सर्जरी विभाग प्रमुख डॉ. नितीन चाटे यांनी संतोषसाठी मदतीचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत व्हॉट्सअप ग्रुपमधील सर्वच डॉक्टरांनी संतोषसाठी हात पुढे केले आणि 50 हजार रुपये जमा झाले. हे पैसे संतोषच्या खात्यावर पाठवण्यात आले आहेत.
रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांनी एका विद्यार्थ्याच्या स्वप्नालाही जीवदान दिलं. या 50 हजार रुपयांमध्ये संतोषचं प्रवेश शुल्क, वसतीगृह आणि मेसचा खर्च भागणार आहे. या वर्षातील प्रवेश शुल्क भरल्यानंतर संतोषला पुढील वर्षासाठी स्कॉलरशीप मिळणार असल्यामुळे प्रवेश शुल्क भरावं लागणार नाही. त्यामुळे त्याचा जवळपास एका वर्षाचा राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न मिटला आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला 'बीजे'च्या विद्यार्थ्यांचे पंख
स्पर्धेच्या युगात कोणत्याही अभ्यासक्रमासाठी कोचिंग क्लासेस लावणं ही सर्वसाधारण बाब झाली आहे. मात्र हे प्रत्येक विद्यार्थ्यालाच शक्य होत नाही. विद्यार्थ्यांना हे शिक्षण मोफत मिळण्यासाठी पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोफत प्रशिक्षण वर्ग सुरु केले. अतुल ढाकणे या विद्यार्थ्याच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या प्रशिक्षण वर्गातील 11 विद्यार्थी 'नीट'मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
संतोष चाटे याच प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थी आहे. बीजेच्या विद्यार्थ्यांनी संतोषला मोफत शिकवण तर दिली. मात्र पुढील खर्चाचा मोठा प्रश्न होता. अखेर डॉक्टरच एका भावी डॉक्टराच्या मदतीला धावून आले.
पाहा व्हिडिओ :
http://
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement