एक्स्प्लोर
दिवाळीच्या निमित्ताने साईमंदिर सजले, लक्ष्मीची पारंपारिक पद्धतीने पूजा
'सबका मलिक एक' असा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या मंदिरात वर्षभरातील सर्व सण, उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. दिवाळीचे लक्ष्मीपूजनही मोठ्या आनंदाने साईमंदिरात केले गेले.
शिर्डी : शिर्डीच्या साईमंदिरात लक्ष्मीची पारंपारिक पद्धतीने पूजा करण्यात आली. वेदमंत्राच्या घोषात साई मंदिरात लक्ष्मीपूजन करण्यात आले. देशभरातील शेकडो भक्त आज शिर्डीत साईदरबारी दिवाळीसाठी येतात आणि दीपोत्सव साजरा करतात. या निमित्ताने साईमंदिर परिसर दिवाळीसाठी खास पद्धतीने सजवण्यात आला आहे.
'सबका मलिक एक' असा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या मंदिरात वर्षभरातील सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. दिवाळीचे लक्ष्मीपूजनही मोठ्या आनंदाने साईमंदिरात केले गेले. यावेळी साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी पूजा केली. साई समाधी समोर वेदांच्या मंत्रघोषात पारंपारिक पद्धतीने पूजा केली गेली.
दरवर्षी हा दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने शिर्डीत साजरा केला जातो. साईबाबांना भाविकांनी अर्पण केलेली सुवर्ण आभूषणे ,चोपडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धुपारती पार पडली. दिपावली निमित्ताने साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. बाबांच्या मुर्तीला आज खास श्रृंगार परिधान करण्यात आला आहे. साईमंदिरालाही आकर्षक विद्यूत रोषणाईने सजविण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
भारत
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement