Lockdown : कोरोना पॉझिटीव्हिटी रेटच्या पार्श्वभूमीवर होणार लॉकडाऊनचा पुढील निर्णय? जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती
राज्यात 36 पैकी 15 जिल्हे असे आहेत जिथे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Lockdown : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना दिलेल्या माहितीत येत्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊनसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय़ प्रशासन घेणार असल्याचे संकेत दिले. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येच घट दिसून येत आहे आणि जिथं रुग्ण दगावण्याचं प्रमाण कमी अथवा आकडा नियंत्रणात आहे, अशा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल केला जाऊ शकतो असे स्पष्ट संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती नाही, तिथे मात्र निर्बंध कायम राहणार असून, काही ठिकाणी आणखी कठोर पावलंही उचलली जाऊ शकतात.
राज्यात 36 पैकी 15 जिल्हे असे आहेत जिथे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील 36 पैकी तब्बल 21 जिल्ह्यांमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 1 टक्क्यांपेक्षाही खाली आली आहे. ही दिलासादायक बाब असली तरी, दुसरीकडे 15 जिल्ह्यांमध्ये मात्र चिंताजनक परिस्थिती असल्याचं चित्र आहे. कारण त्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच प्रमाण हे 2.2 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या जिल्ह्यांमध्ये 'मुंबई पॅटर्न' राबवण्यात येणार असून तिथे कोरोनावर मात करण्यावर भर दिला जाणार आहे. कोरोनातील या लढाईमध्ये मुंबईचा पॉझिटीव्हिटी रेट हा 0.2 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
21 जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढीचा दर हा 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. हा दर 0 टक्के होण्यास बरीच वर्षे लागू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नुकताच जळगाव जिल्ह्याने मुंबई पॅटर्नचा वापर करुन आपल्या जिल्ह्यातील बाधितांचा दर घटवल्याचं उदाहरण इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहे.
Coronavirus Lockdown : 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले महत्त्वाचे संकेत
कोणत्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त?
रत्नागिरी 2.2 %
सिंधुदुर्ग 2.1 %
कोल्हापूर 1.7 %
सोलापूर 1.6 %
बुलडाणा 1.5 %
जाणून घ्या जिल्ह्यांचा कोरोना पॉझिटीव्हिटी रेट
रायगड- 6%
यवतमाळ - 12.24%
सांगली - 21 %
नांदेड - 5%
परभणी - 3.3%
पुणे जिल्हा- 12.1%
कोल्हापूर जिल्हा - 20-21 %
बीड - 14.19 %
उस्मानाबाद - 20-21%
सोलापूर जिल्हा- 10.06 %
अमरावती - 16.99%
सिंधुदुर्ग - 16.5%
चंद्रपूर- 15.14%
वर्धा - 16.78%
नंदुरबार - 4.24%
बुलढाणा - 13.40%
जालना-16.82%
अहमदनगर - 25.26%
वाशिम - 7%
पालघर- 18.00%
ठाणे- 7.11%
नाशिक- 7.38%
सातारा- 17.22%
जिल्ह्यांमध्ये नवे रुग्ण सापडण्याचा वेग आणि त्या तुलनेत होणारे मृत्यू असे सर्व निकष अंदाजात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच लॉकडाऊनसंदर्भातील पुढील निर्णय़ घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.