काँग्रेसचं आंदोलन बेगडी, राज्य सरकारच्या टॅक्समुळेच इंधन दरवाढ : देवेंद्र फडणवीस
इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरू केलंय. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. काँग्रेसचं आंदोलन बेगडी असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.
अमरावती : इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. काँग्रेसचं आंदोलन बेगडी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पेट्रोल, डिझेलची कॉस्ट सी थ्रू आहे. राज्याने पेट्रोल डिझेलवर टॅक्स लावल्यानेचं पेट्रोल, डिझेलचे भाव वाढलेत. त्यामुळे हे आंदोलन बेगडी आंदोलन आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत केलं.
सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती आता नव्वदीपार झाल्या आहेत. त्याविरोधात रत्नागिरीत काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती कमी आहेत. पण, केंद्र सरकार सामान्यांना दिलासा देत नाहीय. कोविडमुळे आर्थिक मंदीचं सावट आहे. उद्योगधंद्यांची दयनीय अवस्था आहे. संपुर्ण अर्थकारण संकटात असताना पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून केंद्र सरकार महागाई वाढवतेय, अशी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे. काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात देशव्यापी आंदोलन पुकारलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? पेट्रोल, डिझेल कॉस्ट सी थ्रू आहे. राज्याने पेट्रोल, डिझेल वर टॅक्स लावला आहे. त्यामुळे राज्य सरकारनेच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवलेत. त्यामुळे काँग्रेस हे आंदोलन बेगडी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत केली. दरम्यान, कापूस खरेदी संदर्भात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. विहित मुदतीत राज्य सरकार कापुस खरेदी करू शकले नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर केंद्र सरकार कापूस खरेदी करायला तयार होतं. त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला 5 हजार 700 कोटी रुपये दिलेत, असेही त्यांनी सांगितले. तर बोगस बियाणे संदर्भात दोषीवर कारवाई झाली पाहिजे, पण आज शेतकऱ्यांचं नुकसान कोण भरपाई करुन देणार? त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, बोगस बियाणे संदर्भात कायद्याप्रमाणे कारवाई करावी तर शेतकऱ्यांचे यात रीतसर अर्ज घ्यावे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
Mission Begin Again | राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनच; मिशन बिगीन अगेनचे जूनमधील नियम कायम
यामुळं वाढत आहेत पेट्रोल-डिझेलचे दर देशात कोरोनामुळं जवळपास अडीचे महिने लॉकडाऊन होता. यामुळं सरकारी तिजोरीवर चांगलाच भार आला. यानंतर सरकारकडे महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल हेच एकमेव चांगले सोर्स आहेत. जीएसटी आणि डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये कोरोना लॉकडाऊनमुळं खूप कमी झाली आहे. एप्रिल महिन्यात सेंट्रल जीएसटी कलेक्शन केवळ 6,000 कोटी रुपयांचं होतं तर एका वर्षापूर्वी या काळात सीजीएसटी कलेक्शन 47,000 कोटी इतकं होतं. यामुळं महसूलवाढीसाठी सरकार सतत पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवत आहे.
Devendra Fadnavis PC | काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधातील आंदोलन बेगडी : देवेंद्र फडणवीस