एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mission Begin Again | राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनच; मिशन बिगीन अगेनचे जूनमधील नियम कायम
राज्यात 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गतचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत.
मुंबई : राज्यात एक जुलैपासून "मिशन बिगीन अगेन"च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहे. एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा हा प्रयत्न आहे. यानुसार मागच्याच आठवड्यात राज्यात सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, 31 जुलैपर्यंत ज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत. त्यात कोणतीही शिथीलता देण्यात आलेली नाही. एकप्रकारे राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवले असे म्हणायला हरकत नाही.
काय आहे 'मिशन बिगीन अगेन'चा दुसरा टप्पा?
- ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन 6.0
- मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्यात ज्या अटी-शर्ती होत्या त्या कायम ठेवल्या आहेत.
- त्यानुसार महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 जुलै रात्री 12 पर्यंत लॉकडाऊन कायम असेल.
- अत्यावश्यक दुकानं आणि ऑन-इव्हन नियमानुसारची नियमावली कायम
- सरकारी आणि खासगी कार्यालयांची नियमावली ही कायम
- राज्यात 31 जुलैपर्यंत जिल्हाबंदी आणि एसटी सेवा ही बंद
- बिगीन अगेननुसार दिलेल्याच सवलतींना मुदतवाढ
राज्यात प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलला सुरुवात कोरोना व्हायरसवरील उपचार पद्धतीत महत्त्वाची समजली जाणारी आणि जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात सुरु झाली आहे. महाराष्ट्र हे प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारं देशातील पहिलं राज्य आहे. आजपासून सोलापूर आणि लातूरमध्ये प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलला सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी साडेबारा वाजता या ट्रायलचं उद्घाटन केलं. सिव्हिल रुग्णालयाच्या रक्तपेढीत दोन दात्यांना बोलावून त्यांचा प्लाझ्मा काढून घेण्यात आला. यासाठी गेल्या आठवड्यातच मशीन कार्यान्वित झाल्या आहेत. प्लाझ्मा थेरपीचा वापर कसा? कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टरांनी अशाप्रकारे प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करुन रुग्णांवर उपचार करण्याचे ठरवलं. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.Concerned District Collector and Commissioners of the Municipal Corporations in the state may enforce certain measures and necessary restrictions in specified local areas on the permitted non-essential activities and movement of persons to control #COVID19: Maharashtra Government https://t.co/6QPs5GPtCY
— ANI (@ANI) June 29, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement