Ghatkopar: कर्जाला कंटाळून वकिलांचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेने वाचला जीव, घाटकोपर येथील घटना
Ghatkopar: संबंधित व्यक्तीनं आत्महत्या करण्यापूर्वी फेसबूकवर एक पोस्ट केली. ज्यात आपण आत्महत्या करीत असल्याचं सांगितलं होतं.
Ghatkopar: कर्जाला कंटाळून एका वकिलांनी आमहत्या करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पोलिसांच्या तत्परतेनं त्यांचे जीव वाचला आहे. ही घटना मुंबईच्या घाटकोपर परिसरात घडलीय. संबंधित व्यक्तीनं आत्महत्या करण्यापूर्वी फेसबूकवर एक पोस्ट केली. ज्यात आपण आत्महत्या करीत असल्याचं सांगितलं होतं. हे बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी वकिलांचे लोकेशन मिळवून त्यांचा जीव वाचवलाय. त्यांनी पोलिसांनी त्यांना समज देऊन आत्महत्येपासून परावृत्त केलं.
परमदेव फकीर अहिरराव असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वकिलांचं नाव आहे. परमदेव हे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोळीबार रोड येथील रहिवासी आहेत. दरम्यान, त्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.या बाबत एक संदेश त्यांनी फेसबुक वर पोस्ट केला.आपण आत्महत्या करण्यास जात असल्याचे लिहिले. आणि तो घरातून कोणाला काही न सांगता निघून गेला.या बाबत त्यांच्या नातेवाईकानी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे, पोलिस उप निरीक्षक अनिल बांगर, किरण पिसाळ आणि पथकाने या परमदेव यांचा शोध सुरू केला. त्यांचा मोबाईल फोन देखील स्विच ऑफ असल्याने पोलिसांना त्यांचे शोध कठीण जात होते. अखेर पोलिसांना त्यांचे शेवटचे लोकेशन मिळाले. ते घाटकोपर आणि पवईच्या मध्यावर असलेल्या डोंगराळ जंगलातले होते. पोलिसांनी या भागात त्याचा तातडीने शोध सुरू केला. दरम्यान, परमदेव हे गळ्यात फास अडकविलेला आणि बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.त्यांच्यावर उपचार करून पोलिसांनी त्यांना घाटकोपर पोलीस ठाण्यात आणून समजावले आणि आत्महत्येपासून परावृत्त केले.त्यानंतर त्यांना सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांचा ताब्यात देण्यात आले.
- हे देखील वाचा-
- ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका न घेण्याच्या निर्णयावर राज्यपालांचा सही करण्यास नकार, भुजबळांची माहिती
- Maharashtra Corona Guidelines : आजपासून राज्यातील निर्बंध शिथील; काय सुरु, काय बंद?
- मोठी बातमी : चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha