मोठी बातमी : चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला अटक
हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला (Hindusthani Bhau Vikas Phatak) अटक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी विकास फाटकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंबई : हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला (Hindusthani Bhau Vikas Phatak) अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी विकास फाटकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याला 11 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर आज त्याला मुंबईच्या धारावी पोलिसांनी अटक केली आहे.
Mumbai: Social media influencer Vikas Fhatak, also known as 'Hindustani Bhau', arrested by Dharavi Police in connection with students' protest in Dharavi y'day over their demand for online exams for classes 10th & 12th, in view of #COVID19. FIR registered against Fhatak & others.
— ANI (@ANI) February 1, 2022
दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला होता. विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊने एबीपी माझाशी बोलताना काल सांगितलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं होतं.
आंदोलनानंतर काय म्हणाला होता विकास फाटक
हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक एबीपी माझाशी बोलताना म्हणाला होता की, "मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. ज्या वेळी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी गरज लागते त्यावेळी मी उभा राहतोय. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्याचा सरकारने विचार केला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले, काही विद्यार्थ्यांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आपण एका व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आंदोलन करावं असं आवाहन केलं."
आधीच्या व्हायरल व्हिडीओत काय म्हणालेला विकास फाटक
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे सोशल मीडिया सेलिब्रिटी हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ असल्याचे बोललं जात आहे. चार दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्याव्यात. शक्य झाले तर रद्द करा पण विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका. जर निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे व्हिडीओत हिंदुस्थान भाऊने म्हटले होतं.
इतर महत्वाच्या बातम्या
Hindustani Bhau Video: हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडिओनंतर दहावी-बारावीचे विद्यार्थी आक्रमक?
रुको जरा, सबर करो डायलॉगने प्रसिद्ध, कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?