एक्स्प्लोर

Ambarnath News : विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, अंबरनाथ येथील घटना

Ambarnath News : पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दुपारी अंबरनाथ येथील जांभूळ गावात ही घटना घडली.

Ambarnath News : अंबरनाथ परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज (दि. 04) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथ (Ambarnath) येथील जांभूळ गावात पाण्याच्या टाकीच्या उभारणीचे काम सुरु होते. टाकीचे काम करीत असताना त्या ठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी पाण्याचा पंप लावण्यात आला होता. अचानक हा पंप बंद पडल्याने सहा कामगार तो पंप पुन्हा सुरू करण्यासाठी गेले होते. 

विजेचा शॉक लागून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

त्यातील तिघा कामगारांनी पंप उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र पंपाचा विजेचा पुरवठा सुरूच राहिल्याने या पंपाचा तीन कामगारांना शॉक (Electric Shock) बसला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तिघांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुलशन मंडल, राजन मंडल, शालिग्राम मंडल अशी मृत कामगारांची नावे आहेत. 

एक कामगार गंभीर जखमी, दोन बचावले

या ठिकाणी असलेला एक कामगार गंभीर जखमी झाला. उर्वरित दोघा कामगारांनी पळ काढल्याने त्यांचा जीव बचावला आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेतली असून त्यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अकोल्यात जमिनीच्या वादातून एकाची हत्या

जमिनीच्या वादातून एकाची गाढ झोपेत असतानाच लाठीकाठी आणि कुर्हाडीनं वार करून निर्घृणपणे हत्या (Crime) करण्यात आली. ही धक्कादायक घटना अकोला (Akola Crime News) जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या बटवाडी गावात घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बटवाडी गावातील सरकारी जागेवरील ताब्यावरुन तीन कुटुंबीयामध्ये वाद सुरू होता. दरम्यान, हा वाद  31 मार्चच्या रात्री अचानक उफाळून आला.  कालांतराने हा वाद इतका विकोपाला गेला की, रात्री साडेअकरा पर्यंत शाब्दिक वाद सुरू होता आणि मध्यरात्रीनंतर दुसऱ्या कुटुंबातील काहींनी आखरे कुटुंबातील एकावर प्राणघातक हल्ला करत त्याला संपवलं. या प्रकरणाची माहिती मिळताच बाळापुर पोलिसांनी (Akola Police) तात्काळ घटनास्थाळ गाठत आतापर्यंत दहा लोकांना ताब्यात घेतले.

इतर महत्वाच्या बातम्या

माफी मागतो आणि आता तोडीबाज म्हणतो एवढा लाचार माणूस हिंदुस्तानात सापडणार का? बच्चू कडूंचा रवी राणांवर 'प्रहार'!

Anandraj Ambedkar: आनंदराज आंबेडकरांनी वंचितला रोखठोक भाषेत सुनावलं, पाठिंबा धुडकावत अमरावती लोकसभेच्या रिंगणातून माघार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Madras High Court : 'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
Aurangzeb Tomb Row : औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 AM : 21 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Clash Market loss : नागपूर हिंसाचारात तीन दिवसात सुमारे 400 कोटी रुपयांचंCBSE Pattern in SSC Board : 'पॅटर्न' बदलणार, सीबीएसई येणार ; अभ्यासक्रमाच कोणते बदल होणार?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Madras High Court : 'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
Aurangzeb Tomb Row : औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
Nagpur News: चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडी जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडीचा जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Embed widget