Pankaja Munde : ... तर मला 'तिथून' कोणीच हटवू शकणार नाही, नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे
मी आता 2024 पर्यंत मैदानात आहे. तुमची इच्छा असेल तर मला 'तिथून' कोणीच हटवू शकणार नाही असे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.
Pankaja Munde Dasara Melava: मी आता 2024 पर्यंत मैदानात आहे. तुमची इच्छा असेल तर मला 'तिथून' कोणीच हटवू शकणार नाही असे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या. तिथून हटवू शकणार नाही, याचा अर्थ नेमका काय घ्यायचा, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. जेव्हा जेव्हा मुख्यमंत्रीपदाची चर्चा होते. त्या त्या वेळी पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी विजयादशमी (Vijayadashami) च्या शुभमुहूर्तावर बीड (Beed) मधील सावरगाव (Sawargaon) येथे आयोजित दसरा मेळाव्यात (Dasara Melava 2023) जनसमुदायाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. मी आता घरी बसणारी नाही. सगळी फिरणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी थकणार नाही, रुकणार नाही, झुकणार नाही, मी उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा कधीही टाकणार नाही असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
मी पडले तरी तुम्ही माझ्या पाठीमागे खंबीर
भगवानबाबांनी आपल्यावर सावली धरली आहे. आता आपल्याला ऊन नाही. पद न देताही तुमची निष्ठा कायम आहे. मी पडले तरी तुम्ही माझ्या पाठीमागे खंबीर राहिले. युद्धाला आपण तयार राहिले पाहिजे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
मुंडे साहेबांच्या स्मारक आता करु नका
मी तुमची सेवक आहे. तुम्हाला हवे असे राजकारण करणार आहे. मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतरही मुंडे साहेब गावागावात आहेत. मुंडे साहेबांना जाऊन दहा वर्ष झालं तरी मुंडे साहेबांचे स्मारक सरकारनं केले नाही. आता मुंडे साहेबांचे स्मारक करु नका असे पंकजा मुंडे म्हणाल्या. आता करायचेच असेल तर महिलांना सन्मान द्या. आता काही बनवायचेच असेल शेतकऱ्यांना आत्महत्येपासून दूर करणारे काही करा, धर्माच्या आणि जातीच्या भींती पाडा, ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण द्या, आरोग्य द्या हेच गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक असल्याचे पंकजा मुंडे म्हणाले.
पंकजा मुंडेंचा इशारा
आता तुमच्यासाठी मैदानात उतरणार आहे. आता मी पाडणार आहे. पैशाच्या जोरावर राजकारण करत आहेत त्याला पाडणार आहे. जो शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण करणार नाही त्याला पाडणार आहे. जो महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करुन देण्यात अडसर असेल त्याला पाडणार आहे. तरुणांना बरोजगारीत टाकणाऱ्यांना पाडणार आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या: