Pankaja Munde : '... तोपर्यंत तोंड दाखवणार नाही', दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचा निर्धार
Pankaja Munde in Dasara Meleva : आता मैदानात उतरणार, महाराष्ट्राचं गतवैभव मिळवण्यात अडसर असणाऱ्यांना पाडणार, असा निर्धार पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात केला आहे.
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात (Dasara Melava) मनातील खदखद बोलून दाखवली. 'ज्यांना पद, प्रतिष्ठा आणि मान मिळतो त्यांचं भागतं. दरवेळी तुम्ही आशा लावता आणि दरवेळी तुमचा अपेक्षा भंग होतो', असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
आता मैदानात उतरणार : पंकजा मुंडे
आता मैदानात उतरणार, महाराष्ट्राचं गतवैभव मिळवण्यात अडसर असणाऱ्यांना पाडणार. आता फक्त समाजाची सेवा करणार लोकांना समर्पित नेतृत्त्व घडवण्यासाठी प्रयत्न करणार आणि रात्रीचा दिवस करणार. मला काही मिळो न मिळो पुढच्या पिढीला गोड जेवण जेवता येईल, यासाठी काम करणार, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
जिंकण्यासाठी निष्ठा गहाण ठेवू शकत नाही
पंकजा मुंडे यांनी पुढे म्हटलं की, 'तुम्ही जिंकण्यासाठी काहीही करु शकता, पण जिंकण्यासाठी निष्ठा गहाण ठेवू शकत नाही. नितीमत्ता गहाण ठेवू शकत नाही. त्यांनी पुढे म्हटलं की, 'मी माझा आणि तुमचा स्वाभिमान मरू देणार नाही. मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला अंतर देणार नाही. मी तुम्हाला न्याय देण्यासाठी 2024 पर्यंत मैदानात आहे आणि तुमची इच्छा असेल तर तिथून मला कुणीच हटवू शकणार नाही.'
मी तुमची कर्जदार
पंकजा मुंडे यांनी जनतेचे आभार मानताना म्हटलं की, 'शिवशक्ती परिक्रमा करण्याआधी मला वाटायचं मी बँकांची कर्जदार आहे, पक्षाची सच्ची कार्यकर्ता आहे, पण शिवशक्ती परिक्रमेनंतर मला साक्षात्कार झाला आणि लोकांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. जेव्हा जनतेने माझ्यासाठी 11 कोटी जमा केले, तेव्हा लक्षात आलं की, मी तुमची कर्जदार आहे. माझ्यावर मालकी तुमची. त्यामुळे जिथे तुमचं भलं तिथेच पंकजा नतमस्तक होईल.'
...तोपर्यंत पुढील दसरा मेळाव्याला तोंड दाखवणार नाही
'2019 च्या पराभवानंतर पाच वर्ष झाले, खूप जीव लावला. मध्य प्रदेशमध्ये मरमर काम केलं, परळीमध्ये काम केलं, दुसऱ्या मतदार संघातील लोकांच्या गाठी भेटी घेतल्या. माझं सरकार होतं, ऊसतोड कामगारांचं महामंडळ माझ्याकडे नव्हतं, निर्णय माझ्याकडे नव्हता. ऊसतोड कामगार कधीच गोपीनाथ मुंडेंचं नाव सोडणार नाहीत. ऊसतोड कामगारांनी राबायचं म्हणून मी सावली बसणार नाही, मीही त्यांच्यासोबत राबणार आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय पुढील दसरा मेळाव्याला तोंड दाखवणार नाही, असं आश्वासनही पंकजा मुंडे यांनी दिलं आहे', असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :