एक्स्प्लोर
कृष्णा नदी पात्रात मगरीने 14 वर्षाच्या मुलाला ओढलं
सांगलीतील पळूस तालुक्यातील ब्रम्हणाळ येथे कृष्णा नदी पात्रातून मगरीने एका 14 वर्षाच्या मुलाला ओढून पाण्यात नेल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

सांगली : सांगलीतील पळूस तालुक्यातील ब्रम्हणाळ येथे कृष्णा नदी पात्रातून मगरीने एका 14 वर्षाच्या मुलाला ओढून पाण्यात नेल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. आज (शुक्रवार) संध्याकाळच्या दरम्यान कृष्णा नदीच्या पात्रात काही मुलं पोहत असताना अचानक एका मगरीने 14 वर्षीय मुलाला पाण्यात ओढून घेतलं. हा मुलगा बेळगावहून आपल्या मामाच्या गावी आला होता. अशी प्राथमिक माहिती समजते आहेत. ही घटना सायंकाळी सहाची सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचं एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. या पथकाने बऱ्याच उशिरापर्यंत मुलाचा शोध घेतला. मात्र, अद्याप तरी या मुलाचा शोध लागलेला नाही. रात्री साडेआठपर्यंत वनविभागच्या पथकाकडून मुलाचा शोध सुरु होता. मात्र, त्यानंतर ही शोधमोहीम थांबवण्यात आली. आता उद्या पहाटेपासून पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात येणार आहे. मात्र, स्थानिकांकडून मुलाचा शोध अजूनही सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मगरीने मुलाला पाण्यात ओढताना काही लोकांनीही पाहिलं होतं. त्यामुळे आता या मुलाला शोधून काढण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा























