Coronavirus LIVE UPDATES | LIVE UPDATE | कोरोनाचा देशातला दुसरा बळी, दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा मृत्यू
LIVE
Background
राज्यातील कोरोनाग्रस्तांपैकी एका वृद्धाची प्रकृती चिंताजनक असली तरी, अन्य रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शिवाय, नागरिकांनी सरसकट कोरोना चाचणीचा आग्रह करु नये, असंही टोपेंनी सांगितलंय. तसेच, शाळांसंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलंय. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता 14 वर गेली असून कोरोनाचा देशातील पहिला बळी कर्नाटकात गेला आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मात्र, स्वतःची काळजी घ्यावी, असं आवाहनही आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केलंय.
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 14 वर, परदेशातून येणाऱ्या संशयितांवर प्रशासनाची नजर, कर्नाटकातल्या कलबुर्गीत कोरोनानं एका वृद्धाचा मृत्यू
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 3100 अंकांनी उसळली, निफ्टीत 950 अंकांची घसरण, गुंतवणूकदार चिंतेत, सोन्याच्या दरातही घसरण
कॉलेज-शाळांना सुट्टी जाहीर करा, कोरोनाच्या भीतीपोटी पालक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, तर प्रस्ताव आल्यास विचार करु, शिक्षणराज्यमंत्री बच्चू कडूंचं आश्वासन
साताऱ्यातील बगाड यात्रा रद्द करा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, यात्रा साजरी करण्यावर कमिटी ठाम
जगभरात सव्वा लाख लोकांना कोरोनाची लागण, मृतांचा आकडा साडेचार हजाराच्या घरात, तर चीननंतर इटलीत सर्वाधिक बळी, 1016 जणांचा मृत्यू