एक्स्प्लोर
उत्साहीपणा दाखवू नका, मंत्री जयंत पाटलांच्या सूचना, रुग्ण वाढल्याने सांगलीत स्वतंत्र समिती
कोरोना व्हायरसचे रुग्ण सांगलीत वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांनी काही निर्देश दिले आहेत. तसेच सांगलीत एक समिती देखील नेमली आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने समिती नेमली आहे. ही समिती तिथे बसून काम करेल. रुग्ण आढळल्यानंतरही लोक अजून ही गंभीर नाहीत. ज्या भागात कोरोनाबाधित लोक आहेत. तो भाग सोडला तरी लोक बाहेर फिरत आहेत. त्यामुळे लोकांनी बाहेर पडू नये. उत्साहीपणा देखील दाखवू नये, अशा सूचना मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यात वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता तीन सदस्यीय समिती नेमली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, या काळात कोणत्याही राजकीय पक्ष, सामाजिक संस्था कोणत्याही हेतूसाठी बाहेर पडू नकाय. तुम्ही काही मदत वाटायला ग्रुपने फिरत आहात. एकत्रित जेवण व्यवस्था तुम्ही करता पण ह्यात गर्दी होते. हे अपेक्षित नाही. आपल्याला कोणाला करोना झाला माहीत नाही. असं असताना घराबाहेर पडू नका. घरात बसून सेवा करा, काहीही मदत करायची असेल तर जिल्हा प्रशासनाला करा. ते व्यवस्था करतील. तुम्ही उत्साहीपणा दाखवून बाहेर पडू नका, असं देखील जयंत पाटील म्हणाले.
सांगली जिल्ह्यात तीन सदस्यीय समिती
सांगली जिल्ह्यात येथे कोरोना रुग्ण जास्त आढळल्याने तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. जेजे हॉस्पीटलच्या डीन पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे. ही तीन सदस्यीय समिती सांगलीमध्येच राहून परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
फेसबुक लाईव्हच्या संवादात ते म्हणाले की, कोरोना व्हायरसची चाचणी करणाऱ्या लॅबला परवानगी देण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. आम्ही त्यांच्याकडे लॅबच्या मागणीसंदर्भात पाठपुरावा करत आहोत. सध्या मुंबईत कोरोना व्हायरसची चाचणी करणाऱ्या चारच लॅब आहेत. जास्त ठिकाणी लॅबला परवानगी दिल्यास त्यातूनही कोरोनाचा फैलाव आणखी वाढू शकतो असे केंद्राचे म्हणणे आहे, असं जयंत पाटील म्हणाले. एन-95 मास्कची कमतरता आपल्याकडे आहे. पण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे युद्धपातळीवर हे मास्क उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे मास्क जसे उपलब्ध होतील, तसे गरजेनुसार ते त्या भागात पोहोचवण्यात येतील, असं जयंत पाटील म्हणाले.
सांगलीमध्ये 24 वर कोरोनाबाधित
सांगलीमधील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागले आहे. सांगली येथे आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.सगळे सांगलीतील करून रुग्णांचा आकडा 24 वर पोहोचला आहे.त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सांगलीच्या इस्लामपूर मधील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सांगलीतील आणखी 25 जणांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये तब्बल बारा जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झाले आहे. 13 मार्च रोजी सौदी अरेबिया मधून इस्लामपूर येथील चार जण उमराह देवदर्शन यात्रेनंतर परतले होते. त्यानंतर या चौघांना 23 मार्च रोजी कोरोना लागण झाली होती. त्यानंतर आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या 34 हून अधिक जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केलं होतं. तरी यामधील पाच जणांना कोरोना लागण झाली होती. बुधवारी(25 मार्च) 25 जणांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. ज्यांचे रिपोर्ट आज आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले असून यामधील तब्बल 12 जणांना कोरोना लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 24वर पोहचली आहे. हे सर्व रूग्ण इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील आहेत. यातील 4 जण हे परदेश वारी करून आले होते व त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील व त्यांच्या संपर्कात आलेल्या अशा 24 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement