एक्स्प्लोर

Coronavirus Prevention | पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळा, महाविद्यालयं बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळले आढळून आले आहेत. यानंतर प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार आणि प्रशासन व्यवस्था यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. याबाबत आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे (Pune), पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) मधील शाळा, महाविद्यालयं बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सोबतच आज रात्री 12 वाजेपासून मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर (Nagpu), पिंपरी चिंचवडमध्ये जिम, सिनेमा हॉल, जलतरण केंद्र बंद करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी लोकांनी अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळली पाहिजे असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं. कोरोनाबाबत घेतलेले निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू केले जाणार आहेत. तसंच खासगी कंपन्यांना शक्य आहे तिथे सर्व कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी द्यावी, असंही ते म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, परीक्षा उशिरा घेण्यासंबंधी विचार केला जात आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. उगाच भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मुंबईत असा निर्णय घेण्यात आलेला नाही. खासगी शाळा काही ठिकाणी स्वत:हून बंद करत आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ नये ही आपली जबाबदारी आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. #CoronaVirus | सॅनिटायझरचा तुटवडा, मुंबईत गेल्या पंधरा दिवसांत आठपट मागणी वाढली  जिम, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद  यावेळी ठाकरे यांनी सांगितलं की, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जिम, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद ठेवण्यात येणार असून मध्यरात्रीपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. मॉल्स, रेस्तराँ, हॉटेल आपण बंद करणार नाही मात्र तिथे जाणं लोकांनी टाळावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. मॉल्स आणि हॉटेल सुरु राहणार मात्र गर्दी टाळावी राज्यात व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा देखील सुरु राहतील. तसेच महानगरांमधील मॉल्स आणि हॉटेल सुरु राहणार आहेत. मात्र, नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. नागरिकांनी भिती न बाळगता आवश्यक ती खबरदारी बाळगावी. सामूहिक कार्यक्रमांमध्ये गर्दी करणे टाळावे. मॉल्स, हॉटेल सुरु असले तरी तेथे जाणे टाळल्यास अनावश्यक गर्दी होणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात सुदैवाने अजून 17 ही रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं दिसत नाहीत. आपण दक्षता घेतली तर पुढील धोका टाळू शकतो, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, रेल्वे आणि बस अत्यावश्यक सेवा असल्याने बंद करु शकत नाही. तसंच धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय तसंच क्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ नयेत. अशा कार्यक्रमांसाठी सरकारकडून परवानगी दिली जाणार नाही. परवानगी दिली असेल तर ती रद्द केली जाईल. #CoronaVirus | महाराष्ट्रातील रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विषाणूची उत्पत्ती स्थानिक नाही मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळले मात्र त्यांच्यात आढळून आलेली नाही. त्यामुळे या विषाणूची तीव्रता कमी झाली असेल तर समाधानाची बाब आहे. मात्र या विषाणूची उत्पत्ती स्थानिक नाही. परदेशी गेलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून त्याचा फैलाव झाला आहे. कालपासून राज्यात तपासणी अधिक तीव्र करण्यात आली असून विविध देशांच्या दुतावासांशी देखील चर्चा केली जात आहे. शासकीय कार्यक्रम रद्द करा यात्रा, सामूदायिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा. लोकांना प्रशिक्षित करा. कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्यावा. शहरातील पर्यटन कंपन्यांना पुढील काही दिवस बुकींग न करण्याच्या सूचना द्या. सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक जागा येथे स्वच्छता ठेवा. जे या सूचनांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करा.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा लपंडाव! विदर्भ-मराठवाड्यासह राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा लपंडाव! विदर्भ-मराठवाड्यासह राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
Raj Thackeray On Balasaheb Thackeray And Sanjay Raut: संजय राऊतांचं नाव ऐकताच शिव्या; एक निर्णय आणि बाळासाहेब म्हणाले, बंदे में दम है, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
संजय राऊतांचं नाव ऐकताच शिव्या; एक निर्णय आणि बाळासाहेब म्हणाले, बंदे में दम है, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Embed widget