एक्स्प्लोर

#CoronaVirus | सॅनिटायझरचा तुटवडा, मुंबईत गेल्या पंधरा दिवसांत आठपट मागणी वाढली

मेडिकलमध्ये सध्या नागरिकांना हव्या असणाऱ्या छोट्या बॉटल्स उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याऐवजी मोठ्या आणि 500 रुपयांहून अधिक किमतीच्या बॉटल्स ग्राहकांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्नही काही ठिकाणी होत आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे दक्षतेपोटी नागरिक मास्क आणि सॅनिटायझरची खरेदी करत आहेत. मात्र मेडिकल शॉपीमधून मास्क पाठोपाठ आता सॅनिटायझर सुद्धा गायब झालेले आहे. नागरिकांना हव्या असणाऱ्या छोट्या बॉटल्स उपलब्ध नसल्याचे कारण सांगत त्याऐवजी मोठ्या आणि 600 रुपयांहून अधिक किमतीच्या बॉटल्स ग्राहकांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्नही काही ठिकाणी होत आहे. चीनमधून संपूर्ण जगभरामध्ये कोरोना व्हायरस दाखल झालेला आहे. आता महाराष्ट्रात ही कोरोना रुग्ण आढळत असल्यामुळे या व्हायरसची लागण आपल्याला होऊ नये म्हणून नागरिक मेडिकल शॉपमध्ये जाऊन मास्क बरोबरच सॅनिटायझरची मागणी करत आहेत. मात्र मेडिकल मधूनच मास्क पाठोपाठ सॅनिटायझर गायब झाले आहेत. अचानक सॅनिटायझरची मागणी वाढल्यामुळे आणि भीतीपोटी प्रत्येकाने एकाऐवजी तीन ते चार सॅनिटायझरच्या बॉटल्स खरेदी केल्यामुळे सध्या मेडिकल शॉप्समध्ये हे सॅनिटायझर उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. #CoronaVirus | महाराष्ट्रातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सॅनिटायझरचे वेगवेगळ्या ब्रॅन्ड सध्या बाजारात उपलब्ध होते. मात्र त्यांची मागणी वाढल्यामुळे या ब्रँडचा पुरवठा कमी झालेला आहे. उत्पादकांनी माल पाठवला नाही तर आम्ही ग्राहकांना द्यायचं कुठून? असं मेडिकल शॉप्स चालकांचं म्हणणं आहे. आम्ही उत्पादकांकडे दररोज मागणी करत आहोत. मात्र मुबलक युनिट्स आमच्याकडे येत नसल्यामुळे आम्ही ग्राहकांपर्यंत ते पोहोचवू शकत नसल्याचं मेडिकल शॉपच्या वतीने सांगण्यात आलं आहे. #CoronaVirus | कोरोनाचा धसका, तुकाराम बीजेवर सावट, प्रसिद्ध येरमाळासह राज्यातील अनेक यात्रा, कार्यक्रम रद्द मुंबईमध्ये प्रत्येक आठवड्याला 2 लाख सॅनिटायझरचे युनिट ( छोटी बॉटल) चा पुरवठा होत असे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरची खरेदी केल्यामुळे सध्या मुंबईतील अनेक मेडिकल शॉपमध्ये हे सॅनिटायझर उपलब्ध नाहीत. आता एक आठवड्याला तब्बल पंधरा लाख युनिटची मागणी होत आहे. मात्र ब्रँडेड कंपन्यांकडून हा पुरवठा वेळेत करणं शक्य नसल्यामुळे सध्या मेडिकल शॉप्समध्ये हे सॅनिटायझर उपलब्ध नाहीत. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने सॅनिटायझर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना अधिक सॅनिटायझरचे युनिट उत्पादन करून ते बाजारात उपलब्ध करून देण्याची विनंतीही केलेली आहे. मेडिकल शॉप्समध्ये सध्या नागरिकांना हव्या असणाऱ्या छोट्या बॉटल्स उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याऐवजी मोठ्या आणि 500 रुपयांहून अधिक किमतीच्या बॉटल्स ग्राहकांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्नही काही ठिकाणी होत आहे. आता अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालून नागरिकांना सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी होताना दिसत आहे. Coronavirus | पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यांसोबतच्या पर्यटकांची माहिती; तुमच्या शहरात किती जण? पाहा गेल्या पंधरा दिवसांपासून सॅनिटायझरची मागणी वाढलेली आहे. या मध्ये ब्रँडेड कंपनीच्या सॅनिटायझरला जास्त मागणी आहे. आमच्याकडे जो माल उपलब्ध होता, तो सर्व आम्ही ग्राहकांना दिलेला आहे. मात्र उत्पादकांकडून अजून माल मिळत नसल्यामुळे सध्या आमच्याकडेही दुसरा पर्याय उपलब्ध नाही. आम्ही या कंपन्यांकडे मालाची मागणी करतोय , मात्र आम्हाला तितकासा प्रतिसाद मिळत नाही, अशी प्रतिक्रिया मेडिकल चालक श्रीधर पाटील यांनी दिली आहे. Coronavirus | जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रसाद दानवे म्हणाले की, सॅनिटायझरच्या छोट्या बाटल्या जरी मेडिकल मध्ये उपलब्ध नसल्या तरी मोठ्या बाटल्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना सहज वापरता याव्यात आणि आपल्याजवळ ठेवता याव्यात अशा छोट्या बाटल्या उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. सॅनिटायझर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसोबत आम्ही बातचीत ही केलेली आहे. त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद आहे. फक्त नागरिकांनी घाबरून न जाता थोडा धीर धरुन संयम बाळगावा अशी आमची त्यांना विनंती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget