Coronavirus Effect | कोरोनाची धास्ती ; भीतीपोटी पेशंटची रूग्णालयांमध्ये गर्दी
मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य शासनाने कस्तुरबा रूग्णालयाबरोबरच इतर रूग्णालयांना देखील सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील डॉक्टर आणि त्यांचे मदतनीस सज्ज झालेले आहेत.
मुंबई : कोरोनाच्या धास्तीमुळे लोक विनाकारण रूग्णालयांमध्ये गर्दी करत आहेत . केवळ खोकला किंवा सर्दी जरी झाली असली तरी आपणाला कोरोना तर झालेला नाही ना ? अशी भीती मनात बाळगून ते रूग्णालयात तपासणीसाठी गर्दी करत आहेत.
महाराष्ट्रा मध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे याची भीती सर्वसामान्य नागरिकांमध्ये बसलेली आहे. आपण कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात तरी आलेलो नाहीत ना? अशी भीती त्यांच्या मनामध्ये घोळत आहे. त्यामुळे साधा खोकला किंवा सर्दी जरी झाली, तरी घाबरून सामान्य लोक वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये डॉक्टरांकडे जाऊन आपली तपासणी करून घेण्यासाठी आग्रह करत आहेत. या आग्रहामुळे डॉक्टरांवरचा ताण अधिक वाढलेला आहे.
मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य शासनाने कस्तुरबा रूग्णालयाबरोबरच इतर रूग्णालयांना देखील सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील डॉक्टर आणि त्यांचे मदतनीस सज्ज झालेले आहेत. गेली वीस दिवस ते या रुग्णांसाठी झटत आहेत. मात्र ही रुग्णसेवा करत असताना डॉक्टर सुद्धा एक माणूस आहे, हे आपण विसरता कामा नये. ते रुग्णांबरोबरच स्वतःची काळजी तर घेत आहेत. मात्र त्यांच्या दैनंदिन कामावर सर्वसामान्य नागरिक अधिक भर टाकून त्यांचा ताण वाढवत आहेत.
सध्या मुंबईतील सर्वच दवाखान्यांमध्ये सकाळी ओपीडी या हाऊसफुल होत आहेत. नागरिक भीतीपोटी चेकअपसाठी रूग्णालयांमध्ये गर्दी करत आहेत . यामुळे डॉक्टर्सच्या कामात अडथळे येत असून काम करणं त्यांना कठीण होत आहे. डॉक्टरही धास्तावले आहेत. पण आपलं कर्तव्य आणि जबाबदारी ते पार पाडत आहेत. यावेळी आपलीही जबाबदारी म्हणून आपण दवाखान्यांमध्ये गर्दी कमी करून डॉक्टरांना मदत करणं गरजेच आहे.
#Coronavirus | कोरोना संशयितांच्या हातावर 'हा' शिक्का असणार!
संबंधित बातम्या :
Coronavirus | जगभरात 24 तासांत 600 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
Coronavirus | राज्यातील एकूण रुग्ण संख्या 39 वर, मुंबईत एका तीन वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट