Coronavirus | राज्यातील एकूण रुग्ण संख्या 39 वर, मुंबईत एका तीन वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट
आज कोरोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या 10 जणांच्या चमूतील 3 जण कोरोना बाधित आढळले असून इतर 7 जण कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत.
मुंबई : राज्यात यवतमाळ येथे एक आणि नवी मुंबई येथे एक असे दोन करोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39 झाली आहे. राज्यात 108 लोक विलगीकरण कक्षात दाखल असून 1063 होम क्वारंटाईन असून त्यापैकी 442 जणांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. दरम्यान मुंबईत एका तीन वर्षाच्या मुलीला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई महापालिकेने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. कल्याण येथील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालेल्या व्यक्तीची 33 वर्षीय पत्नी आणि तीन वर्षीय मुलीचे नमुने कोरोना पॉजिटिव्ह आल्याचा तपशील महापालिकेने दिला आहे.
यवतमाळ येथे कोरोना बाधित आढळलेली 51 वर्षाची महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील आय टी तज्ञाची आई आहे. ती स्वतः ही दुबई सहलीमध्ये सहभागी झाली होती. यामुळे यवतमाळ येथे आढळेल्या रुग्णांची संख्या 3 झाली आहे. दुबईला गेलेल्या 40 जणांच्या चमूतील एकून 15 जण कोरोना बाधित आढळले असून 22 जण निगेटिव्ह आढळले आहेत. या चमूतील बेळगाव येथील 3 जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरात विलग करण्यात आले आहे.
आज कोरोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या 10 जणांच्या चमूतील 3 जण कोरोना बाधित आढळले असून इतर 7 जण कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत.
राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती पिंपरी चिंचवड मनपा- 9, पुणे मनपा- 7, मुंबई -6, नागपूर-4, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण-प्रत्येकी 3, रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद- प्रत्येकी 1 असे एकूण 39 रुग्ण आढळून आले आहेत.
Coronavirus | राज्यातील सर्व विद्यापीठं, महाविद्यालयं बंद, नियोजित परीक्षाही 31 मार्चनंतर
Coronavirus | ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुका पुढे, तर होम क्वॉरंटाईनच्या हातावर शिक्का : राजेश टोपे
राज्यात आज 31 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. 16 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1663 विमानांमधील 1 लाख 89 हजार 888 प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण 1063 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 794 जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 717 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 39 जण पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. राज्य नियंत्रण कक्षाचा 020/26127394 हा नंबर आहे तर टोल फ्री क्रमांक 104 वर कोरोना संदर्भात माहिती मिळू शकते.