LIVE UPDATES | महाविकास आघाडीत नियुक्त्यांवरून पुन्हा नाराजी
-Amarnat Yatra | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची अमरनाथ यात्रा रद्द -विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, राज्य सरकारचा जीआर -Corona Vaccine | ...तर डिसेंबर महिन्यात कोरोनाची लस लोकांना उपलब्ध होऊ शकते, सीरम इन्स्टिट्युटचा दावा -IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या सीजनचं दुबईत होणार आयोजन -Corona Update | ॲक्टिव्ह केसेसमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर, ठाणे दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडीचं अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
कोरोनाव्हायरस लस बनविण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ मागच्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधात लस विकसित करण्याचे काम करत आहे. ऑक्सफर्डने पहिल्या स्टेजमध्ये केलेल्या लसीच्या मानवी परीक्षणाचे निकाल सकारत्मक मिळाले या संदर्भातील अहवाल द लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ही लस कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी मानवी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते.
अधिकृत AZD1222 या नावाने ओळखली जाणारी हीलस जेनर इन्स्टिट्यूटने बनवली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, जेनर इन्स्टिट्यूटची ही लस कोरोनाव्हायरस पासून दुहेरी संरक्षण प्रदान करु शकेल, ही लस शरीरात अँटीबॉडीड आणि किलर टी- सेल्स बनवण्यात मदत करु शकते. ज्यामुळे कोरोनाव्हारस विरुद्ध लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होईल.
भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं महत्त्वाचं
भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं फार महत्त्वाचं आहे. कारण या लसीसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने कोट्यवधींची गुंतवणूक केलीय. सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडे या लसीचे कोट्यवधी डोस तयार आहेत. त्यांनीही या लसीच्या मानवी चाचणीची परवानगी घेतलीय. ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याचं यश आता फार महत्त्वाचं ठरणार आहे. ते यशस्वी झाल्यास कोरोनावर खऱ्या अर्थाने उत्तर सापडलेलं असेल.
दूध खरेदी दरांबाबत आज दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक
दुधाचे दर घटल्यामुळे दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलावली आहे. राज्यात गेल्या चार महिन्यांपासून 'कोरोना'मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी करत आहेत . या विविध समस्यांच्या अनुशंगाने शेतकरी आणि दुध संघाचे प्रश्न समजावून घेवून त्यांचे प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.
कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप यावर्षी होणार नाही, आयपीएलचा मार्ग मोकळा
कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने (ICC) यावर्षी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-20 वर्ल्ड कप रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता टी-20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आज झालेल्या आयसीसीच्या बोर्ड मीटिंगमध्ये वर्ल्ड कप टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ल्ड कप पुढे ढकलल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीजनचा रस्ता मोकळा झाला आहे. वर्ल्ड कप रद्द झाल्यामुळे बीसीसीआयकडून सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलचं आयोजन केलं जाऊ शकतं.























