एक्स्प्लोर

Coronavir Update | महाराष्ट्रात कोरोनाचं सावट! राज्यात 283 नव्या रूग्णांची भर; कोरोना बाधितांचा आकडा 4483 वर

राज्यात 283 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. परिणामी राज्यातील आकडा 4483 वर गेला आहे. तर, राज्यातील सर्वाधिक रूग्ण मुंबई शहरात आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच आज सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात 283 नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 4483 वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक 187 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर भिवंडीमध्ये एक, कल्याण-डोंबिवलीमध्ये 16, मिरा-भाईंदरमध्ये 7, नागपूर 1, नवी मुंबई 9, पनवेलमध्ये 6, पिपंरी-चिंचवडमध्ये 9, रायगड 2, सातारा 1, सोलापूर 1, ठाणे 21, वसई विरार 22 अशी 283 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान, राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुण्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 4483

  • मुंबई महानगरपालिका - 2911 (मृत्यू 132)
  • ठाणे - 41 (मृत्यू 2)
  • ठाणे महानगरपालिका- 110 (मृत्यू 2)
  • नवी मुंबई मनपा - 81 (मृत्यू 3)
  • कल्याण डोंबिवली - 85 (मृत्यू 2)
  • उल्हासनगर - 1
  • भिवंडी, निजामपूर - 6
  • मिरा-भाईंदर - 78 (मृत्यू 2)
  • पालघर - 17 (मृत्यू 1 )
  • वसई- विरार - 118 (मृत्यू 3)
  • रायगड - 15
  • पनवेल - 33 (मृत्यू 1)
  • नाशिक - 4
  • नाशिक मनपा - 5
  • मालेगाव मनपा - 78 (मृत्यू 6)
  • अहमदनगर - 21 (मृत्यू 1)
  • अहमदनगर मनपा - 8
  • धुळे -1 (मृत्यू 1)
  • जळगाव - 1
  • जळगाव मनपा - 2 (मृत्यू 1)
  • पुणे - 17 (मृत्यू 1)
  • पुणे मनपा - 546 (मृत्यू 49)
  • पिंपरी-चिंचवड मनपा - 57 (मृत्यू 1)
  • सातारा - 12 (मृत्यू 2)
  • सोलापूर मनपा - 16 (मृत्यू 2)
  • कोल्हापूर - 3
  • कोल्हापूर मनपा - 3
  • सांगली - 26
  • सिंधुदुर्ग - 1
  • रत्नागिरी - 6 (मृत्यू 1)
  • औरंगाबाद मनपा - 30 (मृत्यू 3)
  • जालना - 1
  • हिंगोली - 1
  • परभणी मनपा - 1
  • लातूर - 8
  • उस्मानाबाद - 3
  • बीड - 1
  • अकोला - 7 (मृत्यू 1)
  • अकोला मनपा - 9
  • अमरावती मनपा - 6 (मृत्यू 1)
  • यवतमाळ - 14
  • बुलढाणा - 21 (मृत्यू 1)
  • वाशिम - 1
  • नागपूर - 2
  • नागपूर मनपा - 67 (मृत्यू 1)
  • चंद्रपूर मनपा - 2
  • गोंदिया - 1
  • इतर राज्ये 13 (मृत्यू 2)
पाहा व्हिडीओ : महाराष्ट्रात कोणीही उपाशी राहणार नाही; खासदार सुप्रिया सुळेंचा जनतेशी संवाद

ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग आजपासून अंशतः सुरू

राज्यात आज म्हणजे 20 एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योग अंशत: सुरू करण्यात आले आहे. येथील उद्योगधंद्यांना अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुंबईतही काही कामांना परवानगी देण्यात येणार आहे. शहरातील कंटेनमेंट झोन वगळून बांधकाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग विषयक नियमांसह अन्य बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. कामगारांची राहण्याची आणि दैनंदिन गरजांची सोय बांधकाम ठिकाणीच करणं बंधनकारक आहे. अटींचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द होणार आहे.

Curfew In Solapur | पुण्यापाठोपाठ सोलापूर शहर सील, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (19 एप्रिल) दुपारी सोशल मीडियाच्या माध्यमाशी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी काही ठिकाणी उद्योगांना अशंत: परवानगी देत असल्याचं त्यांनी सांगितलं. "कोरोनामुळे अर्थव्यवस्था चिखलात रुतली आहे. अर्थचक्र फिरलं पाहिजे म्हणून काही ठिकाणी मोजक्या स्वरुपात उद्योगधंद्यांना परवानगी देत आहोत. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना माफक स्वरुपात परवानगी देत आहोत," असं मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या : 

आंबा बागायतदारांना दिलासा; कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणार स्पेशल पार्सल ट्रेन

Lockdown 2 : देशात आजपासून लॉकडाऊनमध्ये कोणाला सूट मिळणार?

Lockdown2 | ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग आजपासून अंशतः सुरु होणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
Embed widget