एक्स्प्लोर

Curfew In Solapur | पुण्यापाठोपाठ सोलापूर शहर सील, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

सोलापुरात 20 एप्रिल 2020 दुपारी 2 पासून 23 एप्रिल 2020 रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करुन शहराच्या सर्व हद्दी बंद केल्या जाणार आहेत. या काळात मेडिकल, दूध वगळता सर्व दुकानं बंद असतील.

सोलापूर : कोरोना व्हायरसचं वाढतं प्रमाण पाहता सोलापूर जिल्ह्यात तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात येणार असून सर्व हद्दी बंद केल्या जाणार आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हे आदेश दिले आहेत. सोलापूरमध्ये 20 एप्रिल 2020 रोजी दुपारी 2 पासून 23 एप्रिल रात्री 12 पर्यंत संपूर्ण संचार बंदी असेल. याकाळात जीवनावश्यक सेवा, मेडिकल आणि दूध वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहे. किराणा, भाजी, फळं काहीही सुरु राहणार नाही. आदेश आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

"सोलापूर शहरामध्ये कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सोलापूर शहरामध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करुन शहराच्या सर्व हद्दी बंद करणं आवश्यक आहे. त्यामुळे 20 एप्रिल 2020 दुपारी 2 पासून 23 एप्रिल 2020 रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करुन शहरातील सर्व दुकानं आणि शहराच्या सर्व हद्दी बंद करण्यात येत आहे," असं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकात म्हटलं आहे.

Curfew In Solapur | पुण्यापाठोपाठ सोलापूर शहर सील, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

Curfew In Solapur | पुण्यापाठोपाठ सोलापूर शहर सील, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

हा आदेश खालील बाबतीत लागू राहणार नाही.

1. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवणारी खाजगी/ सरकारी रुग्णालये, दवाखाने, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी आणि त्यांची वाहने, तसेच SARI, ILI आणि Contact Tracing या आजारासंदर्भात सर्व्हेक्षण करणारे अधिकारी/ कर्मचारी.

2. ॲम्बुलन्स सेवा.

3. रुग्णालयामध्ये आणि दवाखान्याशी संलग्न असणारी औषधांची दुकाने तसेच इतर औषधांची दुकाने त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.

4. कायदेशीर कर्तव्य बजावत असणारे अधिकारी आणि कर्मचारी, उदा. पाणीपुरवठा, अग्निशमक, विद्युत पुरवठा, पोलीस विभागातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी

5. सकाळी 6.00 ते 9.00 या कालावधीत दूध वाटप आणि विक्री करता येईल.

६. शहरातील पेट्रोल पंप सकाळी 7.00 ते 11.00 या कालावधीत सुरु राहतील. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहने, ॲम्बुलन्स, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर आणि कर्मचारी यांची वाहने तसेच पोलीस विभागाच्या वाहनांना पेट्रोल/डिझेल देण्यात येईल.

काही ठिकाणी भाजी, किराणा खरेदीसाठी गर्दी शहरात दुपारी दोन वाजल्यापासून संचारबंदी लागू होणार असल्याने सोलापूरकरांनी सकाळपासूनच खरेदीसाठी काही ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं समोर आलं आहे. पुढील तीन दिवस संचारबंदी असल्याने भाजी, किराणा इत्यादी वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. मात्र कोणत्याही प्रकारची गर्दी कुठेही करु नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget