एक्स्प्लोर

Lockdown2 | ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग आजपासून अंशतः सुरु होणार!

कोरोनाबाधितांच्या संख्यानुसार महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन तयार करण्यात आले आहेत. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्य सरकारने ग्रीन आणि ऑरेंजमधील उद्योगांना माफक स्वरुपात सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

मुंबई : राज्यात आज म्हणजे 20 एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योग अंशत: सुरु होणार आहेत. इथल्या उद्योगधंद्यांना अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुंबईतही काही कामांना परवानगी देण्यात येणार आहे. शहरातील कंटेनमेंट झोन वगळून बांधकाम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग विषयक नियमांसह अन्य बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. कामगारांची राहण्याची आणि दैनंदिन गरजांची सोय बांधकाम ठिकाणीच करणं बंधनकारक आहे. अटींचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (19 एप्रिल) दुपारी सोशल मीडियाच्या माध्यमाशी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी काही ठिकाणी उद्योगांना अशंत: परवानगी देत असल्याचं त्यांनी सांगितलं. "कोरोनामुळे अर्थव्यवस्था चिखलात रुतली आहे. अर्थचक्र फिरलं पाहिजे म्हणून काही ठिकाणी मोजक्या स्वरुपात उद्योगधंद्यांना परवानगी देत आहोत. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना माफक स्वरुपात परवानगी देत आहोत," असं मुख्यमंत्री म्हणाले.

"काही जिल्हे शून्य रुग्णाचे आहेत. काही ठिकाणी घट झाली आहे. रेड झोन, ऑरेंज , ग्रीन असे झोन केले आहेत. त्यामुळे अशा काही निवडक ठिकाणी आम्ही माफक स्वरुपात उद्योगांना परवानगी देत आहोत. जर तुम्ही तुमच्या मजुरांची काळजी घेत असाल, त्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था करत असाल तर मान्यता मिळेल," असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील ग्रीन,ऑरेंज झोनमध्ये उद्योगधंद्यांना परवानगी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात या अटींवर उद्योगांना परवानगी! पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी वगळून पुणे जिल्ह्यातील काही भागात सर्व क्षेत्रातील उद्योगांना काही अटी आणि शर्तींवर आजपासून परवानगी देण्यात आली आहे. या अटी खालीलप्रमाणे....  - ज्या ठिकाणी कंपनी आहे, त्याच ठिकाणचे कामगार असतील, किंवा कंपनीच्या कॉलनी, गेस्ट हाऊसमध्ये राहणारे कामगार असतील, त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. - इतर शहरातून अथवा ठिकाणाहून कामगारांची ने-आण करण्यास परवानगी दिली जाणार नाही. - कामाच्या ठिकाणीदेखील पुरेशी काळजी घेऊन आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवून काम करण्याचे बंधन आहे. मुंबईत हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणी काही कामांना अटीशर्तीसह परवानगी मुंबईत कोणत्या अटी? मुंबई महापालिका क्षेत्रातील 'कंटेनमेंट झोन' वगळून प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्यास अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. अटींचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे आढळल्यास परवानगी तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. या अटी खालीलप्रमाणे.... - बांधकाम ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या राहण्याची, स्वच्छतेची तसंच इतर आवश्यक गरजांची व्यवस्था ही त्याच ठिकाणी करणे बंधनकारक आहे. - बांधकाम ठिकाणी काम करत असणाऱ्या कामगारांना अन्नधान्य व पाण्यासह त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू सदर ठिकाणी उपलब्ध करून देणे आवश्यक. - कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती वैद्यकीय तपासणी नियमितपणे करुन घेणे. तसेच त्या अनुषंगाने आवश्यकता भासल्यास आवश्यक ते औषधोपचार करणे. - बांधकाम ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्वांनीच 'सोशल डिस्टन्सिंग'चे काटेकोरपणे पालन करण्यासह मुखावरण (मास्क) नियमितपणे वापरणे बंधनकारक. CM Uddhav Thackeray UNCUT | राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना परवानगी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget