Coronavirus | महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार, रुग्णांची संख्या 101 वर
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 101 वर गेली आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणखी वाढली आली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 101 वर पोहोचली आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे. काल संध्याकाळीही सांगलीत चार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 500 पार झाला आहे. तर 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
मुंबईतील 12 जणांची दुसरी चाचणी निगेटिव्ह
दिलासादायक बातमी म्हणजे मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालय दाखल केलेल्या 12 रुग्णांची दुसरी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व रुग्णांना पुढील 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी- मुंबई शहर आणि उपनगर - 38
- पिंपरी चिंचवड मनपा - 12
- पुणे मनपा – 19
- नागपूर – 4
- यवतमाळ – 4
- नवी मुंबई – 5
- कल्याण – 4
- सांगली- 4
- अहमदनगर – 2
- रायगड – 1
- ठाणे – 2
- पनवेल- 1
- उल्हासनगर – 1
- औरंगाबाद – 1
- रत्नागिरी – 1
- वसई-विरार- 1
- सातारा- 2
गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 42 हजार नवे रुग्ण
जगभराताल आज सकाळपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास साधारण 3 लाख 78 हजार लोकांना कोरोना लागण झाली आहे. तर 16 हजर 502 जणांना या जीवघेण्या व्हायरसने बळी घेतला आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 42 हजार नवे रुग्ण आढळले आहेत, तर 1861 जणांचा मृत्यू झाला आहे. इटली कोरोना व्हायरसचा उद्रेक पाहायला मिळत आहे. इटलीमध्ये सर्वाधिक 6,077 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात इटलीत 601 जणांना आपला जीव गमावला आहे.
संबंधित बातम्या :
coronavirus | 19 मार्चपर्यंत देशातून व्हेंटिलेटर, मास्कची निर्यात हा तर गुन्हेगारी कट : राहुल गांधी Lockdown and Curfew | लॉकडाऊन आणि कर्फ्यू यामध्ये फरक काय? Coronavirus | IIT दिल्लीकडून नवी पद्धत विकसित, कोविड-19ची स्वस्त चाचणी शक्य? Coronavirus | भारतावर कोरोनाचं सावट! कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उद्योजकांचा मदतीचा हात Curfew in Maharashtra | महाराष्ट्रात संचारबंदी लावण्याची वेळ का आली? | स्पेशल रिपोर्ट