एक्स्प्लोर

धक्कादायक! बेपत्ता बालकाचा विहिरीत आढळला मृतदेह, बीड जिल्ह्यात खळबळ, चिंचा खाण्याच्या नादात दुर्घटना घडल्याचा संशय

बीडच्या धारुर तालुक्यातील जवळा येथे सोमवारपासून बेपत्ता असलेल्या चार वर्षीय बालकाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Beed News :  बीडच्या धारुर तालुक्यातील जवळा येथे सोमवारपासून बेपत्ता असलेल्या चार वर्षीय बालकाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. असेफ समद शेख हा चार वर्षीय बालक सोमवारी सायंकाळ पासून बेपत्ता होता. नातेवाईक ग्रामस्थ पोलिसांनी रात्रभर त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. आज पुन्हा एकदा ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली असता त्याच्या घरापासून जवळ असलेल्या मिसाळ यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. 

विहिरीच्या बाजूला असलेल्या फिरंगी झाडाच्या चिंचा खाण्याच्या नादात हा बालक विहिरीत पडल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर दफन विधी करण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर जवळा गावावर शोककळा पसरली आहे.

हॉटेलमध्ये चहा पीत बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू

चारचाकी गाडीचा धाराशिव जिल्ह्यात भीषण अपघात झालाय. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गाडी थेट हॉटेलमध्येच घुसली. यामध्ये हॉटेलमध्ये चहा पीत बसलेल्या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. सोलापूरकडून हैदराबादला जाणाऱ्या कारचे टायर फुटून उमरगा चौरस्ता येथे ही घटना घडली आहे. 

गडचिरोली अनियंत्रित ट्रकची तीन वाहनांना धडक, 4 जण गंभीर जखमी

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील कुनघाडा बस थांब्यावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. अनियंत्रित ट्रकने थांब्यावर उभ्या असलेल्या ऑटो, पिकअप व्हॅन आणि दुचाकी अशा तीन वाहनांना जोरदार धडक दिली. यात ऑटोत बसलेले चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा धडकी भरवणारा सीसीटीव्ही समोर आलाय.  अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत सर्व जखमींना कुनघाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.  त्यांच्यावर उपचार सुरू असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

बीड शहरात रिक्षा आणि दुचाकीचा विचित्र अपघात, तीन ते चार जण जखमी

बीड शहरात रिक्षा आणि दुचाकीचा विचित्र अपघात समोर आला. शहरातील बालपीर भागात बीड- अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव रिक्षाचे चाक निखळल्याने हा अपघात घडला. या रिक्षाने तीन दुचाकींना धडक दिली. यात तीन ते चार जण जखमी झाले आहेत. तर रिक्षामध्ये बसलेल्या महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत.. या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. रिक्षाचे पुढील चाक हवेमध्ये तर पाठीमागच्या दोन चाकावरच रिक्षा दुचाकींना धडक देताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget