एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Lockdown and Curfew | लॉकडाऊन आणि कर्फ्यू यामध्ये फरक काय?

लॉकडाऊन आणि कर्फ्यू यात नेमका काय फरक आहे? लॉकडाऊनमुळे फारसा फरक पडला नाही तर कर्फ्यू लावल्याने परिस्थितीत सुधारणा होईल का?

मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तरीही लोक घरातून बाहेर पडत आहेत. यासाठी संपूर्ण पंजाबमध्ये आज कॅप्टन अमरिंदर सिंह सरकारने संचारबंदी म्हणजेच कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या भीलवाडामध्ये मागील आठवड्यातच कर्फ्यू लावला होता. येत्या काही दिवसात अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्याची तयारी आहे. पण लॉकडाऊन आणि कर्फ्यू यात नेमका काय फरक आहे? लॉकडाऊनमुळे फारसा फरक पडला नाही तर कर्फ्यू लावल्याने परिस्थितीत सुधारणा होईल का? लॉकडाऊन म्हणजे काय? खरंतर देशातील लोक पहिल्यांदाच लॉकडाऊन पाहत आहेत आणि ऐकत आहे. पण सामान्यत: कर्फ्यूचा अर्थ संपूर्ण बंद असा लोकांचा समज आहे. १८९३ मध्ये एपिडेमिक म्हणजेच महामारी कायदा अस्तित्त्वात आला होता. या अंतर्गत जिल्हाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना आपापल्या परिसरात लॉकडाऊन करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पाच लोक एकत्रित येण्यावर बंदी येते. अत्यावश्यक सेवा सुरु राहतात, जसं की रेशन, किराणा दुकानं खुली राहतात. बँक आणि एटीएम चालू असतात. हॉटेलही खुले राहू शकतात. दूध आणि भाजीपाल्याची दुकानं खुली राहतात. मीडियाही खुल्या राहू शकतात. पत्रकारांच्या वावरण्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. नियम मोडल्यास काय? लॉकडाऊनचे नियम मोडल्यास भारतीय दंड संहिता अर्थात आयपीसीच्या कलम 269 आणि 270 अंतर्गत कारवाई होते. यात जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. क्वॉरन्टाईनमधून पळ काढणाऱ्यावर आयपीसीच्या कलम 271 अंतर्गत कारवाई केली जाते. पण हे सगळे कायदे अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये मोडतात. न्यायालयाच्या परवानगीशिवाय पोलीस कोणालाही अटक करु शकत नाही. कर्फ्यू म्हणजे काय? कर्फ्यू लागताच सर्व अधिकारी जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्तांकडे येतात. आयपीसीच्या कलम 144 मध्ये कर्फ्यू लावण्याची तरतूद आहे. याचं उल्लंघन केल्यास आयपीसीच्या 188 अंतर्गत कारवाई होते. नियम मोडल्यास कोणालाही अटक करण्याचे अधिकार पोलिसांना असतात. पण लॉकडाऊनमध्ये असं होऊ शकत नाही. कर्फ्यू लागताच जिल्हा प्रशासनाला कारवाई करण्याची पूर्ण सूट मिळते. कर्फ्यू असताना कोणीही घराहेर पडू शकत नाही. बँका बंद राहतात. किराणाची दुकानंही बंद केली जातात. दूध आणि भाजीपाला विकण्यावर बंद असते. हॉटेलही बंद ठेवावे लागतात. कर्फ्यूचा अर्थच आहे सर्वकाही बंद. रस्त्यावर केवळ प्रशासन आणि पोलीस कर्मचारीच दिसतात. रुग्णालय वगळता सर्व आवश्यक सुविधाही बंद केल्या जातात. नियम मोडल्यास का? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लॉकडाऊन न पाळणाऱ्यांविरोधात कारवाई करता येत नाही. परंतु कर्फ्यू तोडल्यास पोलिसांना कारवाईसाठी पूर्ण सूट असते. Punekars on road after Curfew | एक दिवसीय कर्फ्यू पाळल्यानंतर पुणेकर पुन्हा रस्त्यावर, परिस्थितीचं गांभीर्य नाही!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखतRohit Pawar on Ram Shinde : राम शिंदे सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, विजयानंतर रोहित पवारांचा पहिला वारMahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?Rohit Pawar On Ram Shinde | देवेंद्र फडणवीसांनी पैसे वाटलेत तरीही राम शिंदेंचा पराभव- रोहीत पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Embed widget