एक्स्प्लोर

धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त

पुण्यात चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी सुरु असल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला आहे. पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

Pune Crime News : पुण्यात चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी सुरु असल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला आहे. पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. एअर इंटेलिजन्स युनिट ने केली 5 जणांना अटक केली आहे. बँकॉकवरुन पुण्यात आलेल्या विमानातून गांजाची तस्करी सुरु होती. पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिट ची या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे. 

4 प्रवासी हे बँकॉक ते पुणे हा विमान प्रवास करून पुणे विमानतळावर उतरले होते

मिळालेल्या माहितीनुसार, 4 प्रवासी हे बँकॉक ते पुणे हा विमान प्रवास करून पुणे विमानतळावर उतरले होते तर एक व्यक्ती या चौघांना घेण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता. 4 जणांच्या ताब्यातून गांजा जप्त केला असून ते सर्व जणं झारखंड या राज्यातील नागरिक आहेत तर जो व्यक्ती त्यांना घेण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता तो रत्नागिरी जिल्ह्याचा असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
11 फेब्रुवारी रोजी पुणे विमानतळावर 5.4 करोड रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा अटक करण्यात आलेला आरोपी हा बँकॉक वरून पुण्यात आला होता. 

चार जणांना नोकरीचे आमिष दाखवण्यात आलं होतं

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉक ला गेलेल्या या चार जणांना नोकरीचे आमिष दाखवण्यात आलं होतं. तिथे गेल्यावर त्यांना तुम्ही संधी गमावली असून तुम्हाला आता नोकरी देता येणार नाही असं सांगण्यात आलं आणि परतीच्या वेळी प्रत्येकाला एक चॉकलेटचा डबा देण्यात आला ज्यामध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला. एअर इंटेलिजन्स युनिट कडून या प्रकरणाचा सगळ्या अनुषंगाने तपास सुरू आहे. 

गांजा तस्करीच्या घटानांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या काही भागात या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठ दिवसाखाली जळगाव जिल्ह्यात देखील गांजा तस्करीची घटना घडली आहे. जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी  मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद वाहनातून  स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत लाखोंचा गांजा जप्त करण्यात आला असून दोन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत . ३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते . फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने तपासणीसाठी घेतले आहेत .पहूर पोलीस  यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Nashik Crime News: 300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget