एक्स्प्लोर
Advertisement
coronavirus | 19 मार्चपर्यंत देशातून व्हेंटिलेटर, मास्कची निर्यात हा तर गुन्हेगारी कट : राहुल गांधी
एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सध्या 40 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. पण कोरोनाचं वाढतं संकट बघता या गोष्टींचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देशात व्हेंटिलेटर आणि मास्कचा तुटवडा भासत असताना या गोष्टी 19 मार्च पर्यंत निर्यात होत राहणं हा गुन्हेगारी कटच आहे अशा कडक शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.कोरोना च्या संकटावर मात करण्यासाठी आपल्या आरोग्य यंत्रणेला सर्जिकल मास्क आणि व्हेंटिलेटर या बेसिक गोष्टींची जास्त आवश्यकता आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने 24 फेब्रुवारीला दिलेल्या निर्देशानुसार सर्व राष्ट्रांना आपापल्या देशात या गोष्टींचा राखीव साठा करण्यास सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही भारतात 19 मार्च पर्यंत या गोष्टी निर्यात होत राहिल्या. ही गंभीर बाब असून या बाबत वाणिज्य मंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सध्या 40 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. पण कोरोनाचं वाढतं संकट बघता या गोष्टींचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनीही याबाबत तातडीने कारवाई करण्याची विनंती पंतप्रधानांना ट्विटरवरुन केली आहे. आपल्या देशामध्ये अशा पद्धतीच्या संकटाला तयार राहावे लागणार याची कुणकुण दोन महिन्यांपासून असतानाच सरकारने हे का होऊ दिलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय आता इंटरनॅशनल फ्लाइट्स बंदी असल्यामुळे व्हेंटिलेटरसाठी आवश्यक कच्च्या मालाचा तुटवडा ही भासतो आहे असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे यावर तातडीने उपाय शोधणे आवश्यक आहे असं खासदार राजीव सातव यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटले आहे.
देशात अवघ्या आठवडाभराच्या काळात करोना बाधितांची संख्या 433 वर पोहोचली आहे. ज्या वेगानं हा संसर्ग पसरतो आहे ते पाहता आपली आरोग्य यंत्रणा या संकटासाठी सक्षम असणे आवश्यक आहे मात्र अशा पद्धतीचे गंभीर धोरणात्मक चूका उघडकीस आल्याने काँग्रेसकडून याबाबत मोदी सरकार वर टीका होते आहे. पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संशोधनात करोनाशी लढणाऱ्या डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्या बद्दल कृतज्ञता म्हणून थाळीनाद करण्याचं आवाहन केलं होतं पण आता या सर्वांना आवश्यक असणाऱ्या या गोष्टीबाबत सरकार काय पावले उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.
संबंधित बातम्या :
Lockdown and Curfew | लॉकडाऊन आणि कर्फ्यू यामध्ये फरक काय?
Coronavirus | IIT दिल्लीकडून नवी पद्धत विकसित, कोविड-19ची स्वस्त चाचणी शक्य?
Coronavirus | भारतावर कोरोनाचं सावट! कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उद्योजकांचा मदतीचा हात
#Coronaeffect | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळलं जाण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement