एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊनचं पालन न करणं महागात, बारामतीत न्यायालयाकडून तिघांना शिक्षा, महाराष्ट्रातील पहिलीच घटना
लॉकडाऊनचे पालन न करणं आता चांगल महागात पडू शकतं.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे नियम मोडल्याने बारामतीत न्यायालयाकडून तिघांना शिक्षा करण्यात आली आहे. ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.
बारामती: बारामती तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनचे पालन न करणे आता तुम्हाला चांगलेच महागाच पडू शकते. कारण लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत केवळ पोलिसांकडूनच दंडुके किंवा वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन सोडले जायचे. आता मात्र लॉकडाऊनचे नियम न पाळल्यास तुम्हाला सरळ तुरुंगात जावे लागेल. विनाकारण बाईकवर फिरणे, दुकानदारांतडून सूचनांचे पालन न होणे, अत्यावश्यक सेवा वगळता उगाच बाहेर फिरुन संचारबंदीच्या नियमांचे पालन बारामतीत न्यायालयाने तिघांना शिक्षा सुनावली आहे.
Coronavirus | कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची खैर नाही : अजित पवार
लॉकडाऊनचे पालन न केल्याबाबत बारामतीत बऱ्याच जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी आज न्यायालयाने तिघांना शिक्षा दिली आहे. यात बारामती तालुका पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार अफजल बनीमिया आत्तार रा.श्रीरामनगर, चंद्रकुमार जयमंगल शहा रा.सुर्यनगरी ,अक्षय चंद्रकांत शहा रा.वडगाव निंबाळकर या सर्व आरोपींना प्रत्येकी तीन दिवस कैद किंवा 500 रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.
ही शिक्षा थोडी किंवा छोटी वाटत असली तरी या व्यक्तींना भविष्यात चारित्र्य पडताळणीमध्ये शिक्षा झाली म्हणून कोणतीही शासकीय किंवा खाजगी नोकरी मिळणार नाही. त्याचबरोबर भविष्यात पासपोर्ट, शस्त्र परवाना , व्यवसाय परवाने मिळताना मोठी अडचण निर्माण होणार आहे. आपल्या थोड्या चुकीमुळे आपले स्वतःचे भविष्य अंधारात टाकणारे हे पाऊल आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या स्वतःच्या घरात बसून गंभीरपणाने लॉकडाऊनचे पालन करणे आवश्यक आहे, असे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी म्हटले आहे.
नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही : अजित पवार
कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आणि नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कैक पटीने वाढत असतानाही नागरिक भाजीपाला, किराणाच्या नावाखाली घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करत आहेत. त्यामुळेच अजित पवार यांनी आता अधिक कठोर पावलं उचलण्याचा इशारा अजित पवारांनी दिला आहे.
India Lockdown | Ajit Pawar | डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ले कराल तर खबरदार : अजित पवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement