एक्स्प्लोर
Advertisement
कोरोनाचा राजकारण्यांनाही धसका, मंत्र्यांसह काही आमदार, महापौरांना लागण
कोरोनाविरोधातील लढाईत अनेकजण कोरोनाच्या विळख्यातून जसे अनेक कोरोना योद्धे सुटले नाहीत तसं अनेक लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली. काही नेत्यांना तर कोरोनामुळे आपला जीव गमावला लागला.
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चाललाय. कोरोनाविरोधातील लढाईत अनेकजण कोरोनाच्या विळख्यातून जसे अनेक कोरोना योद्धे सुटले नाहीत तसं अनेक लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली. काही नेत्यांना तर कोरोनामुळे आपला जीव गमावला लागला. महाराष्ट्रात कालपर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या विळख्यातून रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, कोरोनाच्या संकटात रस्त्यावर आपलं कर्तव्य बजावणारे पोलीसही सुटले नाहीत. सोबतच ज्या लोकप्रतिनिधींवर कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी आहे, त्या लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
या नेत्यांना कोरोनाची लागण, अनेकांनी केली मात
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना काळात नागरिकांना मदत करण्यासाठी ते प्रत्यक्ष मैदानात उतरले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांना देखील नांदेडमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर मुंबईत उपचार झाले आणि नंतर डिस्चार्ज मिळाला. मंत्री धनंजय मुंडे यांच्या सह त्यांचे सचिव, पीए आणि काही कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची बाधा झाली. ते देखील कोरोनावर मात करुन बाहेर आले.
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना देखील कोरोनाची लागण झाली. तसेच आमदार मुक्ता टिळक यांनाही कोरोनाची लागण झाली. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना देखील कोरोनाची लागण झाली. दौंडचे आमदार राहुल कुल यांनाही काल कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह त्यांच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मीरा भायंदरच्या आमदार गीता जैन, नाशिक देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर मात केली आहे. माजी खासदार आनंद परांजपे यांनी देखील कोरोनावर मात केली आहे. सोलापूरचे महापौर श्रीकांचना यन्नम यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
देशपातळीवर भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन तसेच भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
या राजकारण्यांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनाविरोधातील लढाईत काही राजकीय नेत्यांचा बळी देखील गेला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी, जळगावमधील रावेरचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांना कोरोनामुळं जीव गमावावा लागला. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, औरंगाबाद महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवी, पडेगाव येथील शिवसेना नगरसेवक रावसाहेब आमले, राष्ट्रवादीचे सोलापूरचे माजी आमदार युनूस शेख यांचा देखील कोरोनाची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहे.
राज्यात कालपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 लाख 17 हजार 121 इतकी झाली आहे. काल 3 हजार 296 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 18 हजार 558 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 89 हजार 294 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात काल 224 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement