Nanded: पत्रकार गृह निर्माण संस्थेच्या जागेवर अवैधरित्या कब्जा करून बांधकाम, काँग्रेस आमदारांचं कृत्य
Nanded: आरोप जेष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी (Aniket Kulkarni) सह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आरोप केलाय.
नांदेड महापालिका (Nanded Municipal Corporation) क्षेत्रातील पत्रकार गृह निर्माण संस्थेसाठी महापालिकेने दिलेल्या भूखंडावर महापालिका व रजिस्ट्री कार्यालयाच्या संगनमताने काँग्रेस आमदार माधवराव पाटील जवळगावकर (Madhavrao Patil Jawalgaonkar) यांनी अनधिकृत कब्जा करून अवैध बांधकाम करत असल्याचा आरोप जेष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी (Aniket Kulkarni) सह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
नांदेड महापालिकेने पत्रकार गृह निर्माण संस्थेसाठी नांदेड शहरातील असदुल्लाबाद व शोभानगर परिसरात सर्व्हे नंबर एक व दोन मध्ये देण्यात आला होता. त्या भूखंडावर आता शहरातील व्यापारी व राजकारण्यांनी डोळा ठेवून सदर भूखंड रजिस्ट्री कार्यालयाने कोणतीही शहानिशा न करता बोगस रजिस्ट्री करून कॉग्रेस आमदाराच्या नावे करून दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्या जागेवर काँग्रेस चे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार माधवराव पाटील जावळगावकरांनी या गृह निर्माण संस्थेच्या जागेवर तीन मजली टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरू केलेय.
सदर पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या जागेवरील अतिक्रमना संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना विचारणा करण्यात आली असता. या प्रकरणात नांदेड सह जिल्हा निबंधक वर्ग -1 मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकृत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीवर केल्या जाईल असे आश्वासन देण्यात आले.
नांदेड महापालिकेने महापालिका क्षेत्रातील सर्व्हे नंबर 1 व दोन मध्ये पत्रकारांच्या निवासस्थानासाठी दोन एकर जागा आरक्षित करून देण्यात आली होती.तर नांदेड शहरातील सिडको परिसरात पत्रकार भवन साठीही जागा महापालिकेने दिली होती. परंतु सदर लाखों करोडो रुपये किमतीच्या जागा येथील राजकीय व व्यापारी लोकांनी सह-जिल्हा निबंधक कार्यालय व महापालिकेसी संगनमत करून गिळंकृत केल्याचे चित्र आहे. याविषयी जिल्ह्यातील अनेक जेष्ठ पत्रकार ,सामाजिक व राजकीय संघटनांनी आवाज उठवला पण यावर अद्याप तरी कोणतीही कार्यवाही झाली नाहीये.
पत्रकार गृह निर्माण संस्थेच्या जागा हस्तांतरना विषयी जिल्हा सह निबंधक बोराळकर यांना विचारणा केली असता,कोणत्याही जागेचे दस्तावेज आमच्याकडे आले असता ते खरे की खोटे हे पाहणे आमचे काम नसून आमचे काम फक्त दस्त घेऊन रजिस्ट्री करणे आहे.असे बेजबाबदार व अजब उत्तर देण्यात आले. तर नांदेड वाघळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांना सदर प्रकरणा विषयी विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय.
पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांच्या निकटवर्तीय आमदाराच्या घराचे अवैध बांधकाम प्रशासनाने तात्काळ न थांबविल्यास जेष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. तर भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष यांच्याकडून आंदोलनाचा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे.त्यामुळे महापालिकेने दिलेल्या जागेवर सत्ताधारी पक्षातील आमदारांकडून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर,एरवी सामान्य नागरिकांना बांधकाम परवानगीसाठी खेटे मारायला लावणारी महापालिका,सदर अवैध बधकामा विषयी पुरावे असतानाही कार्यवाहीचा हातोडा चालवत नसल्यामुळं पत्रकारांनी मात्र संताप व्यक्त केलाय.
हे देखील वाचा-
- ST Strike : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, कामगार न्यायालयाचा निर्वाळा
- घरबांधणी अग्रिम योजना पुन्हा सुरू होणार, राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना होणार लाभ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha