एक्स्प्लोर

हर्षवर्धन पाटील की दत्तात्रय भरणे? इंदापूर विधानसभेत कुणाच्या जागेला कात्री?

सध्या भरणे आणि पाटील हे तालुक्याच्या विविध कार्यक्रमात एकत्र येताना पाहायला मिळत असले तरी या दोघांचे कार्यकर्ते मात्र आम्हीच इंदापूरची जागा लढविणार यावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यात जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी झाली तरी इंदापूरच्या जागेत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

इंदापूर : इंदापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे एकाच कार्यक्रमात एकत्र दिसून आले. या दोघांनी शहरातील अलंकार परिवाराच्या एस. एस. मोबाईल शॉपचं उद्घाटन फित कापत केलं. पण या उद्घाटनानंतर आगामी विधानसभेत नेमकं कोणाच्या जागेला कात्री लागणार यावरुन चर्चा रंगत आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी अनेक वर्ष मंत्री म्हणून राज्यात काम केलं आहे. त्यामुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग राज्यभर आहे. तर हर्षवर्धन पाटील यांना मागील विधानसभेत पराभूत करुन जायंट किलर ठरलेले धनगर समाजाचे नेते म्हणून दत्तात्रय भरणे यांची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून चांगले मताधिक्य मिळवून देण्यात आघाडी यशस्वी ठरली असली तरी हे मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेसचे का काँग्रेसचे यावरुन तालुक्यात कायमच खलबतं सुरु असतात. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने पाटील आणि भरणे एकत्र येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. VIDEO | इंदापूरचे हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर? नेमकं तथ्य काय? | एबीपी माझा मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले व इंदापूर विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा भरणे यांनी फडकवला. यासाठी त्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे सहकार्य मिळाले. अजित पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून हर्षवर्धन पाटील यांना ओळखले जाते. या दोघांचे राजकारणातील विळा- भोपळ्याचे वैर आख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात इंदापूरची जागा कोणाला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. इंदापूरची जागा अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे . तर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी जवळीक साधत या जागेवर काँग्रेसच्या वतीने दावा केला आहे. मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खुद्द अजित पवार यांनी आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल पण ही इंदापूरची विधानसभेची जागा राष्ट्रवादीच लढविणार असे जाहिर वक्तव्य इंदापूरमध्ये केलं होतं. पण अजित पवारांचे हे वक्त्यव्य लोकसभा निवडणुकीच्या अगोदरचे होते. यंदाच्या लोकसभेत आघाडी झाली.  अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे यांनी एकत्र व्यासपीठांवर येऊन सुप्रिया सुळेंचा एकत्रित प्रचार केला. सुळे यानी इंदापूर तालुक्यात अधिकचे मताधिक्य मिळविले. सध्या भरणे आणि पाटील हे तालुक्याच्या विविध कार्यक्रमात एकत्र येताना पाहायला मिळत असले तरी या दोघांचे कार्यकर्ते मात्र आम्हीच इंदापूरची जागा लढविणार यावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यात जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी झाली तरी इंदापूरच्या जागेत बिघाडी होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकंदरीतच लोकसभेला हर्षवर्धन पाटील यानी केलेल्या मदतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा काँग्रेसला देत हर्षवर्धन पाटील यांना हात देणार का? की या जागेवर आपला दावा सांगून पुन्हा हर्षवर्धन पाटील यांना अडचणीत आणणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget