(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अहमदनगरमध्ये 'योगायोग' शब्दावरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांत कलगीतुरा, नेमकं काय घडलं?
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन वास्तूच लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी 'योगायोग' शब्दावरून दोन्ही मंत्र्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळाला.
अहमदनगर : काँग्रेसचे नेते (Congress) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thackeray) आणि शिवसेनेचे नेते (Shiv Sena) जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन वास्तूच लोकार्पण सोहळा संपन्न झाला.. यावेळी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होता. यावेळी सोहळ्याच्या भाषणात 'योगायोग' शब्दावरून दोन्ही मंत्र्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळाला. त्याला कारण होतं 2014 ला थोरातांच्या हस्ते ज्या वास्तूचे भूमिपूजन झाले त्याच थोरात यांच्या हस्ते 8 वर्षांनी या वास्तूचे लोकार्पण पार पडले.
बाळासाहेब थोरात 2014 ला महसूल मंत्री असताना अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन झालं होतं आणि आज 8 वर्षांनी त्यांच्या हस्ते महसूल मंत्री असताना या वास्तूचे लोकार्पण पार पडत असल्यानं जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी या योगायोगावरून भाष्य केले आणि त्याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर देताना हा योगायोग अजून किती वर्षे चालेल माहीत नाही. तुम्ही बरोबर आहात, पुढे गेले तरी त्यालाही शुभेच्छा, असं म्हटल्यानं एकच हशा पिकला.
मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, 8 वर्षांपूर्वी थोरात साहेबांनी याची पायाभरणी केली. 8 वर्ष तसा मोठा काळ. आज 8 वर्षांनी थोरातांच्या हस्ते याचं उद्घाटन होत हा एक योगायोग आहे. योगायोगाचं दुसरं नाव बाळासाहेब थोरात हेच आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन राजकारणात काम केलं तर त्यांच्या इतकं नाही मात्र त्यांच्या पाठीमागे जाता येईल अशी मला खात्री वाटते, असं गडाख म्हणाले.
मंत्री बाळासाहेब थोरातांनी म्हटलं की, आम्ही 12 हजार कोटी कर्ज काढले. मात्र कुणाचे पगार थकवले नाही, याबाबत सरकारचे कौतुक झालेच पाहिजे. सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेऊन काम केलं पाहिजे. जितकी संधी मिळेल म्हणजे हा योगायोग किती वर्षे आहे अजून मला माहित नाही. आमच्या पाठीमागे तुम्ही आहात. आम्ही कुठे नाही म्हणतो. थोडं चालत राहा आणि आमच्या पुढे जा. आमच्या शुभेच्छाच राहतील परंतु जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत आपली बांधीलकी सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी राहील आणि आपल्या काळात काही तरी चांगलं करूयात, असं थोरात म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- वादग्रस्त वक्तव्यानंतर कालीचरण महाराज अडचणीत; महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत नथुरामचं कौतुक
- मंहत राम सुंदर दास यांचा धर्मसंसदेतून काढता पाय, कालीचरण यांच्या वक्तव्यावर नाराजी
- साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करा, एकल आसवनी प्रकल्प अटीबाबत पाहा काय म्हणतायेत शेतकरी नेते...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha