एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी शिवीगाळ, भाजप शहराध्यक्षावर गुन्हा दाखल

भाजप पदाधिकारी दर्शनाला आल्यावर त्यांनी थोडावेळ थांबण्यास सांगताच बाचाबाचीला सुरुवात केली. यावेळी संतापलेल्या भाजप अध्यक्षांनी थेट प्रांताधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वरच्या पट्टीत बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.

पंढरपूर :  पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी शिवीगाळ करणाऱ्या भाजपच्या शहराध्यक्षा विरोधात मंदिर समितीच्या कर्मचाऱ्याने पंढरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संजय वाईकर असे या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. आज दुपारी विठ्ठल मंदिरात भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना दर्शन देण्यासाठी आले होते. सध्या दिवाळी सुट्ट्यामुळे दर्शनासाठी तोबा गर्दी असल्याने दर्शनाची रांग सारडा भवन पर्यंत पोचलेली होती. यामुळे मंदिराचे कार्यकारी अधिकाऱ्यांनी दर्शन रांगेतील सर्वसामान्य पर्यटकांना लवकर दर्शन मिळावे यासाठी घुसखोरी करून झटपट दर्शन घेणाऱ्या सर्वच VIP दर्शन बंद ठेवण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले होते. यातच हे भाजप पदाधिकारी दर्शनाला आल्यावर त्यांनी थोडावेळ थांबण्यास सांगताच बाचाबाचीला सुरुवात केली. यावेळी संतापलेल्या भाजप अध्यक्षांनी थेट प्रांताधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वरच्या पट्टीत बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. उपस्थितांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने मस्तीत शिवीगाळ सुरूच ठेवली.  प्रांताधिकाऱ्यांनी आपण यावर मुख्यमंत्र्यांना तक्रार करू असे सांगताच खुशाल करा अशी उर्मट भाषा वाईकर याने वापरली.  उर्मट भाषा या भाजप पदाधिकाऱ्याने सर्व कर्मचारी आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांसमोर शिवीगाळ केल्यावर सहनशीलपणे सर्व ऐकून घेणाऱ्या कार्यकारी अधिकाऱ्याने उठून जाणे पसंत केले. यानंतर संतप्त झालेल्या विनोद वाघमारे या मंदिर कर्मचाऱ्याने वाईकर याच्या विरोधात जातीवाचक  शिवीगाळ केल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 02 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget