एक्स्प्लोर
सरकारचे प्रयत्न सुरु, पण विद्यार्थ्यांनीही 'नीट'साठी तयार राहावं: मुख्यमंत्री
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांवर 'नीट' परीक्षा लादण्यात आली असून त्यामुळे त्यांचं नुकसान होईल. राज्य सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहे. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी परीक्षेची तयारी करावी. 'नीट'प्रश्नी केंद्र सरकार काही करु शकेल का, अशी विनंती पंतप्रधानांना करणार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विद्यार्थ्यांना दिलं आहे.
'नीट' परीक्षेच्या घोळाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थी आणि पालकांसह 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?
"राज्य सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील भूमिकेला पालकांचं समर्थन आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक वेळी सरकारची मागणी फेटाळली. परंतु शक्य तेवढे प्रयत्न करण्याचं आश्वासन मी पालकांना दिलं आहे. मी 'नीट'प्रश्नी पंतप्रधानांना भेटून केंद्र सरकार यावर काही तोडगा काढू शकतं का," अशी विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितल. "मात्र राज्य सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरु ठेवावी," असं आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं विद्यार्थ्यांना केलं आहे.तावडेंनी माझ्या मुलाची फसवणूक केली, पालक पोलिसात
दरम्यान, राज्यात नीट परीक्षेवरुन निर्माण झालेल्या घोळावर आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वपक्षीय सभासद सर्वोच्च न्यायालयाला आपल्या निर्णयावर विचार करण्याची विनंती करणार आहेत. ही मागणी मान्य न झाल्यास केंद्र सरकार या प्रश्नावर अध्यादेशामार्फत तोडगा काढण्याच्या विचारात असल्याचं समजतं. संबंधित बातम्या'नीट' प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
‘नीट’ प्रश्नी सुप्रीम कोर्टाचा विद्यार्थ्यांना दिलासा नाही
‘नीट’विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार
त्यापेक्षा अभ्यास करा, ‘नीट’बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली
‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement