एक्स्प्लोर
राज्यभरात ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता
काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतमालाची काळजी घ्यावी, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
मुंबई : राज्यात आजपासून पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणासह तापमानात घट होणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतमालाची काळजी घ्यावी, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आहे. या भागात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
त्यामुळे कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असं आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं.
या वातावरणाचा परिणाम म्हणून काल कोकणातील लांजा, कुडाळ, सावंतवाडी परिसरात हलका पाऊस झाला. तर गोव्यातील डिचोली, वाळपईसह, केपे, पणजीसह राज्यभरात वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement