एक्स्प्लोर
सप्टेंबरमध्ये सिडकोची 95 हजार घरांची लॉटरी, अल्प, अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांना फायदा
सिडकोच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी 95 हजार घरांची लॉटरी काढण्याची घटना घडणार आहे.

नवी मुंबई : सिडकोच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी 95 हजार घरांची लॉटरी काढण्याची घटना घडणार आहे. नवी मुंबई, पनवेल भागात सिडको एकाच वेळेस बंपर अशी 95 हजार घरांची लॉटरी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढणार आहे. सिडकोच्या या बंपर लॉटरीचा अत्यल्प, अल्प आणि मध्यमवर्गीयांना फायदा होणार आहे. घणसोली, वाशी, जुईनगर, तळोजा, पनवेल भागात घरांची उभारणी केली जाणार आहे. 94 हजार घरांच्या उभारणीसाठी सिडको मंडळाने 19 हजार कोटींच्या खर्चाला मंजूरी दिली आहे. यातील 53 हजार घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी, 41 हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी आरक्षित आहेत. 95 हजार घरापैकी 35 टक्के घरे ही पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव आहेत. Cidco Lottery 2018: सिडको लॉटरी, घरांच्या किमती, एरिया आणि सर्व काही व्हिडीओ पाहा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























