400 वर्षे जुन्या वटवृक्षाची कत्तल वाचवण्यासाठी सांगलीत उभे राहिले 'चिपको आंदोलन'
400 वर्षांहून अधिक जूने हे झाड असल्याने त्याच्या बचावासाठी ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत. या महाकाय वटवृक्षानजीक पर्यावरण प्रेमींनी एकत्र येत सोशल डिस्टन्स ठेवत प्रतिकात्मक चिपको आंदोलन केले आणि पर्यायी मार्गाने रस्ता करून हा वटवृक्ष वाचवावा अशी मागणी केलीय.
सांगली : 400 वर्षाच्या वृक्षाला वाचवण्यासाठी सांगली मध्ये चिपको आंदोलन उभा राहत आहे. मिरज-पंढरपूर मार्गावरील भोसे नजीक महामार्गाच्या रस्त्याच्या कामाच्या निमित्ताने वट वृक्ष असणाऱ्या कत्तल करण्यात येत आहे. मात्र सांगलीतील वृक्ष प्रेमींनी आता एकत्र येऊन 400 वर्षाच्या वृक्ष संवर्धनासाठी चिपको आंदोलन करत चळवळ सुरू केली आहे.
मिरज तालुक्यातील भोसे येथील यल्लम्मा मंदिरानजीकचा विशालकाय वटवृक्ष रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गात येत असल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे . आजपर्यंत या महामार्गासाठी रस्त्यावरील अनेक झाडे तोडली गेली, याला कुणी विरोध केला नाही. मात्र 400 वर्षांहून अधिक जूने हे झाड असल्याने त्याच्या बचावासाठी ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत . ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवाराने वटवृक्ष तसाच ठेवून त्याच्या शेजारून रस्ता करावा, अशी मागणी करीत आंदोलनाची हाक दिलीय. या महाकाय वटवृक्षानजीक पर्यावरण प्रेमींनी एकत्र येत सोशल डिस्टन्स ठेवत प्रतिकात्मक चिपको आंदोलन केले आणि पर्यायी मार्गाने रस्ता करून हा वटवृक्ष वाचवावा अशी मागणी केलीय.
नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे गावच्या हद्दीतील यल्लम्मा मंदिरानजीक सुमारे 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष उभा आहे . राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मिरज - पंढरपूर राज्यमार्गावर अनेक पुरातन झाडांची कत्तल करण्यात आली . तानंग फाटा ते विठ्ठलवाडी गावच्या परिसरातील हजारो लहान - मोठी झाडे बळी पडली आहेत . शेकडो वर्षांपूर्वीच्या झाडांची कत्तल करण्यापूर्वी त्याचे पुर्नरोपण करता येण्यासारखे होते . मात्र महामार्ग बांधणीसाठी नियुक्त कंपनीने झाडांचा फडशा पाडला आहे . तोडलेली झाडेही कुठे गेली , त्याचे काय झाले , त्याची वासलात कुठे लावली याचा कुणालाच पत्ता नाही . किमान मोठ्या झाडांबाबत कंपनीने पर्यावरणाचा विचार करुन निर्णय घेणे गरजेचे होते . यल्लम्मा मंदिरानजीकच्या वटवृक्षाशेजारीच मोठा पूल उभारला जात आहे . त्यामुळे नजीकच्या काळात या वृक्षाचाही बळी जाणार हे निश्चित आहे . जसे मंदिर चा भाग प्रशासनाने पाडला जाणार नाही असे सांगितले तसेच हा वटवृक्ष देखील पाडला जाऊ नये अशी मागणी होत आहे.
सांगली जिल्ह्यातुन जाणाऱ्या नागपूर-रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.या रस्ते कामासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. मात्र मिरज - पंढरपूर मार्गावरील असणाऱ्या एका झाडाच्या कत्तलीवरून आता आंदोलन सुरू झाले आहे. भोसे नजीक असणाऱ्या यल्लमा देवीच्या मंदिर येथील एक 400 वर्षांपूर्वीचे जीर्ण आणि विस्तीर्ण असे वटवृक्ष तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र सांगलीतील वृक्ष प्रेमींनी याला विरोध केला आहे. झाडाची कत्तल करण्याऐवजी 400 वर्षांचे असणाऱ्या या वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी एकजूट झाले आहेत. तसेच 400 वर्षांचे हे झाड वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे आणि आज झाडाच्या ठिकाणी वृक्ष प्रेमींनी एकत्र येऊन झाड वाचवण्यासाठी प्रतिकात्मक चिपको आंदोलन केले आहे. 400 वर्षांचा हा ठेवा असून हे झाड कत्तल करून तोडून टाकण्याऐवजी जोपासले पाहिजे, हे झाड तोडण्यापेक्षा त्याच्या बाजूने रस्ता काढणे हा पर्याय आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत झाड तोडू देणार नाही,यासाठी प्रसंगी तीव्र जन आंदोलन छेडू,असा इशारा वृक्ष प्रेमींनी दिला आहे.
वारकऱ्याच्या विसाव्याचे ठिकाण
मिरज-पंढरपूर मार्गावरील हे भले मोठे वडाचे झाड असून या झाडाने अनेकांना सावली देण्याचे काम केले आहे. त्याच बरोबर वर्षानुवर्षे या झाडाच्या मार्गावरून पंढरपूरच्या वारीसाठी पायी जाणाऱ्या वारकरयांसाठी हक्काचे सावली देणारे हे झाड आहे. याठिकाणी असणाऱ्या मंदिराबरोबर हे झाड वारकऱ्यांना ऊन पाऊस यापासून नेहमी रक्षण करत आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे प्रत्यके वारकरी या झाडयाच्या आश्रयाला असतो. मिरज-पंढरपूर मार्गावरून दरवर्षी विठ्ठलाच्या भेटीला शेकडो पालख्या जात आसतात. यातील बहुतांश पालख्याचा मुक्काम या वटवृक्षाखाली वर्षांनुवर्षे होत राहिला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या शेकडो वारकऱ्यांना हा वटवृक्ष आज पर्यंत आसरा देत आला आहे.आज हे झाड वाचविण्यासाठी काही पर्याय आहेत मात्र त्या पर्यायांचा विचार झालेला दिसत नाही. यासाठी अभिनेते सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री परिवाराचे सदस्यनी आंदोलन पुकारले आहे.
संबंधित बातम्या :
राज्यातील जुनी झाडं वाचवण्यासाठी सयाजी शिंदे सरसावले, फोटोसहीत माहिती पाठवण्याचं आवाहन
SAVE OLD TREES! जुन्या दुर्मीळ झाडांसह आपले सेल्फी पाठवा! अभिनेते सयाजी शिंदेंचं आवाहन