एक्स्प्लोर

छगन भुजबळांचे सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना पत्र; मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेबाबत केली मोठी मागणी

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेबाबत छगन भुजबळांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना पत्र दिलं आहे. या पत्रातून त्यांनी सचिवांना मोठी मागणी केली आहे.

Chhagan Bhujbal मुंबई : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) अध्यादेश जारी केला आहे. कुणबी नोंदी सापडलेल्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) देण्याचा निर्णय सरकारने घेतला. सरकारने मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या जारी केलेल्या अध्यादेशावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती घेतल्या जातील. त्यानंतर 16 फेब्रुवारीनंतर जीआर लागू करण्याचे विचारात घेतले जाईल, असे अध्यादेशात म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयाला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी कडाडून विरोध केला आहे. आता भुजबळांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना पत्र धाडले आहे. 

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्र.49 महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अधिनियम  विमुक्त जाती भटक्या जमाती,  इतर मागासवर्ग व   विशेष मागास वर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व  त्याच्या पडताळणीचे  विनियमन) अधिनियम 2000  दि.26 जानेवारी 2024 या अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. 

हरकत नोंदवायला 30 दिवस मुदत देणे हा नियम

छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, मराठा समाजाचा ओबीसींमध्ये (OBC) सरसकट समावेश करण्यासाठी सगेसोयरे या शब्दाच्या व्याख्येबाबत शासनाने असाधारण क्र. 49 महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अधिनियम  विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000 दि.26 जानेवारी 2024 अन्वये नियमांचा मसुदा तयार केला आहे. या मसुद्यावर हरकत नोंदविण्यासाठी दि. 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. कोणत्याही कायदेशीर मसुद्यावर हरकत नोंदवायला 30 दिवस मुदत देणे हा सर्वसामान्य नियम असल्याचे म्हटले आहे.

15 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी

तसेच हा विषय कायदेशीर आणि क्लिष्ट असल्याने गाव, खेड्यापर्यंत या विषयाची माहिती व्हायला वेळ लागत आहे. त्याचप्रमाणे शासनाने पत्राद्वारे हरकत मागवल्या असून या हरकती मंत्रालयात मुंबईला पोस्टाने यायला वेळ लागणार असल्याने अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी किमान 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे.  

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांत त्यांनी पाण्याचा थेंब देखील घेतलेला नाही. उपचार घेण्यासाठी देखील त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कालपासून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. 

आणखी वाचा 

सरकार डोके बिघडल्यासारखं बोलत आहेत; स्वंतत्र आरक्षणावरून मनोज जरांगे संतापले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
Beed Crime: माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
Embed widget