एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
52 तास सलग स्वयंपाक, शेफ विष्णू मनोहर विश्वविक्रमाच्या तयारीत
नागपूर : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या सलग 52 तास स्वयंपाक करण्याच्या विक्रमाला नागपुरात सुरुवात झाली आहे. जागतिक विक्रम रचण्यासाठी तीन दिवस ते सलग खाद्यपदार्थ बनवणार आहेत.
मैत्री परिवारातर्फे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्स येथे शुक्रवारी मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात विष्णू मनोहर हे सलग 52 तासांत एक हजारापेक्षा जास्त शाकाहारी पदार्थ तयार करुन विश्वविक्रम स्थापन करण्याचा प्रयत्न करतील.
यापूर्वी 40 तास सलग स्वयंपाक करण्याचा जागतिक विक्रम नोंदवण्यात आला आहे. 12 मार्च 2014 रोजी 40 तास कुकिंगचा विक्रम अमेरिकेतील ग्रीन व्हिलेजचे बेंजामिन पेरी यांनी नोंदवला आहे. विष्णू मनोहर हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न नागपुरात करतील.
शुक्रवारी 21 एप्रिलला सकाळी 7.15 वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली. 23 एप्रिलच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा खाद्यपदार्थांचा उत्सव चालणार आहे. या मॅरेथॉन उपक्रमात जवळपास सर्व भारतीय खाद्यपदार्थ तयार केले जातील. केवळ 40 पदार्थ हे भारताबाहेरील असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement