एक्स्प्लोर

Water Crisis : चिंता वाढली! बुलढाण्यात पाणी टंचाईचं संकट अधिकच गडद; जिल्ह्यात अवघे काही दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक

Buldhana Water Crisis : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईचे भीषण सावट निर्माण झाले असताना, आता जिल्ह्यात अवघे 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Buldhana Water Crisis : विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून तापमानाचा पारा रोज नवे उच्चांक गाठत आहे. अशातच दुसरीकडे राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील जलसंकट (Water Crisis) अधिक गडद झाल्याने नागरिकांना मे महिन्याचा शेवटाला पाण्यासाठी मोठी वनवण करावी लागत आहे. गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने एकट्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील तीन मोठ्या आणि पाच मध्यम जलाशयात पाणीसाठा कमी जमल्याचे निदर्शनात आले होते.

परिणामी, यावर्षी जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईचे भीषण सावट निर्माण झाले असताना, आता जिल्ह्यात अवघे 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यातील 65 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी देखील नागरिकांना मोठा संघर्ष करवा लगत असल्याचे चित्र आहे. 

अवघे 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक

वाढत्या तापमानामुळे बुलढाणा जिल्ह्यातही आता भीषण पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. यात आता जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पात फक्त अकरा टक्के उपयुक्त जलसाठा उरला असून साधारणतः 28 दिवस पुरेल एवढा हा जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यात 65 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सुदैवाने जिल्ह्यात कुठेही चारा संकट अद्यापही उद्भवलेलं नाही. मात्र आगामी काळात अशीच परिस्थिती अधिक काळ कायम असल्यास ती स्थितीही उद्भवण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

2023-24 या वर्षात मान्सून मध्ये बुलढाणा जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस पडला. तर धरणाच्या कॅचमेंट एरियात सुद्धा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तीन मोठे प्रकल्प आणि पाच मध्यम प्रकल्प हे भरलेच नाही. त्यामुळे आता उन्हाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा नसल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. पावसाळा संपला त्यावेळी जिल्ह्यात सरासरी 63 टक्के पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी हा जलसाठा बाष्पीभवन व इतर कारणांनी घटल्याने सध्या जिल्ह्यात फक्त 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा उरला आहे. 

जिल्ह्यातील फक्त 11 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक 

राज्याप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातही दिवसेंदिवस पाणीटंचाई संकट हे अधिक गडद  होताना दिसत आहे.  जिल्ह्यातील मोठ्या तीन प्रकल्पात फक्त 11 टक्के उपयुक्त जलसाठा उरलेला आहे. हा जलसाठा पुढील 28 दिवस पुरेल एवढाच आहे. मात्र सध्याही जिल्ह्यातील सात तालुक्यातील 65 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जात आहे. आगामी काळात लवकर पावसाळा सुरू झाला नाही तर मात्र जिल्ह्यातील पाणीटंचाईचा संकट हे मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. सुदैवाने जिल्ह्यात सध्या तरी जनावरांसाठी चारा उपलब्ध असून कुठेही चाऱ्याचे संकट नसल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भौगोलिक दृष्ट्या बुलढाणा जिल्ह्याचे दोन भाग आहे. एक म्हणजे घाटावरील भाग आणि दुसरा म्हणजे घाटाखालील भाग. मात्र, यावर्षी घाटावरील सात तालुक्यात पाणीटंचाईच संकट मोठ झाल आहे. बुलढाणा , चिखली , देऊळगाव राजा , सिंदखेड राजा , लोणार आणि  मेहकर या तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. सुदैवाची बाब म्हणजे घाटाखालील कुठल्याही तालुक्यात पाणीटंचाईच संकट सध्या तरी नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kabutar Khana : देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाने जैन समाज आनंदी, दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री आज तातडीने हटवणार
देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाने जैन समाज आनंदी, दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री आज तातडीने हटवणार
कबुतरं म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, दिल्लीला रवाना
कबुतरं म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, दिल्लीला रवाना
Manoj Jarange : मुंबईत 29 ऑगस्टला जे नेते येणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाडा; जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना थेट इशारा
मुंबईत 29 ऑगस्टला जे नेते येणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाडा; जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना थेट इशारा
मोठी बातमी! ओला-उबरच्या धर्तीवर सरकारी अ‍ॅप येणार, ST महामंडळ चालवणार; परिवहन खात्याचा मोठा निर्णय
मोठी बातमी! ओला-उबरच्या धर्तीवर सरकारी अ‍ॅप येणार, ST महामंडळ चालवणार; परिवहन खात्याचा मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kabutar Khana : देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाने जैन समाज आनंदी, दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री आज तातडीने हटवणार
देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाने जैन समाज आनंदी, दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री आज तातडीने हटवणार
कबुतरं म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, दिल्लीला रवाना
कबुतरं म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, दिल्लीला रवाना
Manoj Jarange : मुंबईत 29 ऑगस्टला जे नेते येणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाडा; जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना थेट इशारा
मुंबईत 29 ऑगस्टला जे नेते येणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाडा; जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना थेट इशारा
मोठी बातमी! ओला-उबरच्या धर्तीवर सरकारी अ‍ॅप येणार, ST महामंडळ चालवणार; परिवहन खात्याचा मोठा निर्णय
मोठी बातमी! ओला-उबरच्या धर्तीवर सरकारी अ‍ॅप येणार, ST महामंडळ चालवणार; परिवहन खात्याचा मोठा निर्णय
मोठी बातमी! स्टार्टअपसाठी उद्योजगता धोरण, फ्रेट कॉरिडोअरला मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! स्टार्टअपसाठी उद्योजगता धोरण, फ्रेट कॉरिडोअरला मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
Nishikant Dubey : ठाकरे बंधूंविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढणार? मनसे आता थेट कोर्टात खेचणार
ठाकरे बंधूंविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढणार? मनसे आता थेट कोर्टात खेचणार
Rohit Pawar and Meghna Bordikar: माझ्या लोकांच्या गाड्यांना हात लावला तर माय झ#$ टाकेन पोलिसांची, मेघना बोर्डीकर शेजारी असताना खुलेआम धमकी, रोहित पवारांनी ट्विट केला 'तो' व्हिडीओ
माझ्या लोकांच्या गाड्यांना हात लावला तर माय झ#$ टाकेन पोलिसांची, मेघना बोर्डीकरांसमोर धमकी, रोहित पवारांनी ट्विट केला 'तो' व्हिडीओ
Video: मनसेचा बँकेत सिनेस्टाईल राडा; पोलिसांसमोरच बँक अधिकाऱ्याला कानाशिलात लगावल्या
Video: मनसेचा बँकेत सिनेस्टाईल राडा; पोलिसांसमोरच बँक अधिकाऱ्याला कानाशिलात लगावल्या
Embed widget