Buldhana Accident: भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक, 3 तरुण जागीच ठार, बुलढाण्यात भीषण अपघात
चुलत भावांसह मित्रही जागीच ठार, बुलढाण्यात हिट अँड रन अपघातामुळे परिसरात शोककळा
Buldhana Accident: बुलढाण्यातील अमडापूर येथे शुक्रवारी रात्री एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या हिट अँड रन घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे. चिखलीहून उदयनगरला जात असताना हा अपघात घडला असून तिघे जागीच गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये प्रतिक भुजे (वय 25 वर्षे), प्रथमेश भुजे (वय 26 वर्षे) आणि सौरभ शर्मा या तीन तरुणांचा समावेश आहे. यातील प्रतिक आणि प्रथमेश हे चुलत भाऊ होते, तर सौरभ त्यांचा मित्र होता. हे तिघे चिखलीहून उदयनगर येथे जात होते, त्याचवेळी अमडापुर परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.
नक्की काय झाले?
बुलढाण्यात अमडापूर येथे शुक्रवारी रात्री हिट अँड रन प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. बुलढाण्यातील चिखलीहून उदयनगरकडे हे तीन तरुण जात होते. त्यावेळी अमडापूर रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने या तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, तिघांनीही जागीच प्राण गमावले. घटनेनंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे. या हिट अँड रन प्रकाराने अमडापुर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अमडापुर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेने मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन तरुणांचा असा अंत झाल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी वाहनचालकाला लवकरात लवकर अटक करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.