एक्स्प्लोर
गाय झाली नॉन व्हेजिटेरिअन! बुलडाण्यात कोंबड्यांवर ताव मारणारी गाय
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्याच्या टाकरखेड गावात वेगळीच गाय पाहायला मिळत आहे. ही गाय चक्क कोंबड्या फस्त करत असल्याचा अजब प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

बुलडाणा : गाय हा खरं तर शाकाहारी प्राणी, मात्र भूक भागवण्यासाठी एक गाय चक्क कोंबड्या फस्त करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बुलडाण्यातील मांसाहारी गायीचा व्हिडिओ समोर आला आहे. वाघ, सिंह, चित्ता, अस्वल, लांडगा, कोल्हा यासारखे मांसाहारी प्राणी आपली भूक शमवण्यासाठी शिकार करुन पोट भरतात, तर रवंथ करणारे प्राणी पोटाची खळगी भरण्यासाठी फळं, कंदमुळे, चारा, गवत अशा पदार्थाचं सेवन करतात. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्याच्या टाकरखेड गावात मात्र वेगळीच गाय पाहायला मिळत आहे. ही गाय चक्क कोंबड्या फस्त करत असल्याचा अजब प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. टाकरखेड येथील शेतकरी बारस लोनाग्रे यांची पाळीव गाय संधी मिळेल तेव्हा कोंबड्यांची शिकार करते आणि आपली भूक शमवते, असं गावकऱ्यांनी बघितलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























