एक्स्प्लोर

Breaking News LIVE : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका अर्चना बारणे यांचं डेंग्यूने निधन

Breaking News LIVE Updates, 13 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE :  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका अर्चना बारणे यांचं डेंग्यूने निधन

Background

Coronavirus : मुंबईत कॉकटेल अॅन्टीबॉडीजचा प्रयोग यशस्वी; औषधोपचारानंतर मृत्‍यू दरामध्‍ये तब्‍बल 70 टक्‍के घट

कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्‍या (मुंबईत कॉकटेल अॅन्टीबॉडीजचा प्रयोग यशस्वी) उपचार पद्धतीनं अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात आतापर्यंत सुमारे 200 पेक्षा अधिक रुग्‍णांवर या पद्धतीने उपचार करण्‍यात आले आहेत. हा प्राथमिक प्रयोग यशस्‍वी ठरला आहे. कारण, हे मिश्रि‍त औषध दिल्‍यानंतर फक्‍त एकाच (0.5 टक्‍के) रुग्‍णास प्राणवायू पुरवठ्याची गरज भासली तर मृत्‍यू दरामध्‍ये तब्‍बल 70 टक्‍के घट झाली आहे. एवढेच नव्‍हे तर रुग्‍णालयातील उपचारांचा कालावधी 13 ते 14 दिवसांवरुन कमी होवून आता 5 ते 6 दिवसांवर आला आहे. 

कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा प्राथमिक प्रयोग अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी करण्‍यात आला आहे. हा प्रयोग अत्‍यंत यशस्‍वी ठरला आहे.

कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी अमेरिकेमध्‍ये नोव्‍हेंबर 2020 पासून कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा उपयोग करण्‍यात येत आहे. अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष  डोनाल्‍ड ट्रम्‍प हे कोरोनाबाधित झाल्‍यानंतर त्‍यांना देखील हेच मिश्रित औषधोपचार देण्‍यात आले होते. त्‍यानंतर त्‍यांच्‍या प्रकृतीमध्‍ये अत्‍यंत वेगाने सुधारणा झाली. भारतामध्‍ये अलीकडेच म्‍हणजे, दिनांक 10 मे 2021 रोजी केंद्रीय औषधी प्रमाणके नियंत्रण संघटनेकडे (Central Drugs Standard Control Organisation मान्‍यता दिली आहे.

राज्य मानवाधिकार आयोगावरील रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत

राज्य मानवाधिकार आयोगावरील रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मात्र ही मुदतवाढ देताना, "ही शेवटची मुदतवाढ, यानंतर वेळ वाढवून मागू नका" या शब्दांत हायकोर्टानं राज्य सरकारला बजावलं आहे. सोमवारी सरकारी वकील निशा मेहरा यांनी हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आयोगावर नियुक्तसाठी निवडलेल्या नावांची यादीच कोर्टापुढे सादर केली. तसेच दोन महिन्यांत या नियुक्त्या केल्या जातील, अशी हमीही दिली. जी मान्य करत हायकोर्टानं यासंर्भातील याचिकेवरील सुनावणी 13 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

नागरीकांच्या मुलभूत हक्क आणि प्रतिष्ठेचे रक्षण व्यावं, या उद्देशानं स्थापन करण्यात आलेल्या  मानवाधिकार आयोगाचं कामकाज सध्या ठप्प झालेलं आहे. याची गंभीर दखल घेत आदेश दिल्यानंतर गेल्या दिडवर्षात आयोगाच्या अध्यक्षांसह अन्य 25 रिक्तपद भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारला हायकोर्टानं चांगलंच धारेवर धरलं होतं. मुख्य न्यायमूर्ती दीपांकार दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं इतकी वर्ष मानवाधिकार आयोग अध्यक्षांचे पद रिक्त का?, तत्कालीन न्यायमूर्तींनी तीन जणांच्या नावांची शिफारस केली होती. मग निर्णय घ्यायला इतका वेळ का लागतो?, असा सवाल करत राज्य सरकारला सोमवारपर्यंत यावर उत्तर देण्याचे आदेश दिले होते.

कोरोना काळात आदिवासी बांधवांना दिलासा; खावटी अनुदान योजनेचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

आदिवासी विकास विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना देऊ केलेले खावटी अनुदान हे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल असल्याचे गौरवोद्गार नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. निमित्त होतं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत खावटी योजनेच्या ऑनलाइन उद्घाटन समारंभाचे. काल (सोमवारी) आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जगभरात सगळ्यांनाच लॉकडाऊन पाळावा लागला. याचा फटका इतर सर्व घटका प्रमाणेच हातावर पोट घेऊन जगणाऱ्या आदिवासी समाजाला देखील बसला, या अवघड काळात राज्यातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी 2013 साली बंद करण्यात आलेली खावटी कर्ज योजना अनुदान स्वरूपात सुरु करण्याचा निर्णय या सरकारने घेतला. 

राज्य सरकारच्या निर्णयानुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्गत गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि भामरागड या दोन प्रकल्प क्षेत्रातील लाभार्थ्यांना काल (सोमवारी) अनुदान वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी प्रातिनिधीक दोन लाभार्थ्यांची नावे घेवून पालकमंत्री यांचे अनुमतीने खावटी योजनेतील अन्नधान्य कीटचे वितरण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, मंत्री महोदयांच्या सूचनेवरून कीट वाटप करण्याचा मान प्रकल्प कार्यालयातील वर्ग-4 मधील महिला कर्मचाऱ्याला दिला. या कार्यक्रमाला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार रामदासजी आंबटकर, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आदिवासी विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे-वर्मा, व्यवस्थापकीस संचालक नितीन पाटील, प्रकल्प अधिकारी भामरागड शुभम गुप्ता, प्रकल्प अधिकारी अहेरी श्री अंकित, जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर आणि विशेष कार्य अधिकारी सुनिल भजनावळे उपस्थित होते.

22:41 PM (IST)  •  13 Jul 2021

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका अर्चना बारणे यांचं डेंग्यूने निधन

नगरसेविका अर्चना बारणे या गेल्या आठवड्यापासून आजारी होत्या. शुक्रवारी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लक्षणं अनेक असल्याने त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार त्यांचे नमुने घेण्यात आले. तेंव्हा सोमवारी त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. सोबतच कावीळ ही झाल्याचं समोर आलं. दोन्ही पातळ्यांवर उपचार सुरू होते. मात्र काही दिवस आजार अंगावर काढल्याने, शरीर उपचारांना साथ देत नव्हतं. अखेर आज सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमी वयातच त्या सर्वांना सोडून गेल्यानं हळहळ व्यक्त केली जातीये. 

अर्चना बारणे यांनी पहिल्यांदाच 2017ची महापालिका निवडणूक लढवली आणि प्रभाग क्रमांक 23 मधून त्या भाजपच्या चिन्हावर नगरसेविका झाल्या. स्थायी समितीचं सदस्य पद आणि 'ग' प्रभाग कार्यालयाचं अध्यक्षपद भूषविण्याची संधी ही त्यांना मिळाली. गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या काळात ही त्या अनेकांच्या मदतीला धाऊन आल्या. आगामी महापालिका निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने देखील त्यांची मोर्चेबांधणी सुरू होती. पण अशात अर्चना बारणेंना डेंग्यूने मात्र गाठलं. डेंग्यूसोबतच त्यांना कावीळ देखील झाली. याचं निदान होईपर्यंत उशीर झाला आणि त्यांच्या आयुष्याची दोर कापली गेली. अतिशय शांत, संयमी आणि मितभाषी स्वभावाच्या त्या होत्या. म्हणूनच त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात देखील हळहळ व्यक्त केली जातीये.

21:04 PM (IST)  •  13 Jul 2021

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नवीन नियुक्ती, कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून राहूल रेखावर यांची नियुक्ती

20:25 PM (IST)  •  13 Jul 2021

चंद्रपूर : आरपीएफच्या कोठडीत संशयित आरोपीचा मृत्यू, बल्लारपूर येथील आरपीएफच्या चौकीतील घटना

चंद्रपूर : आरपीएफच्या कोठडीत संशयित आरोपीचा मृत्यू. बल्लारपूर येथील आरपीएफच्या चौकीतील घटना, अनिल गणपत मडावी (२९) असं मृतकाचं नाव असून तो विरूर येथील रहिवासी आहे. त्याला विरूर रेल्वे स्टेशनमधील तांब्याची तार चोरल्या प्रकरणी आरपीएफने काल अटक केली होती. आरपीएफच्या कोठडीत असतांना काल संध्याकाळी त्याची प्रकृती बिघडली आणि चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यावर काल रात्रीच त्याचा मृत्यू झाला, या प्रकरणी बल्लारपूर पोलीस तपास करत आहेत.

19:12 PM (IST)  •  13 Jul 2021

नाशिकमधील निफाड जवळच्या नांदूर-माध्यमेशवर जवळील गोदावरी नदीच्या पात्रात पिकअप गाडी पालटुन 2 जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील निफाड जवळच्या नांदूर-माध्यमेशवर जवळील गोदावरी नदीच्या पात्रात पिकअप गाडी पालटुन 2 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले. सिन्नर येथून येवला तालुक्यातील जळगाव-नेऊन येथे वऱ्हाड घेऊन ही पिकअप येत असताना ती नदीच्या पात्र पलटी झाली. घटना घडतात परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले त्यांच्यावर निफाड येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. 

18:31 PM (IST)  •  13 Jul 2021

पीजी नीटची तारीख जाहीर

पीजी नीटची तारीख जाहीर! NEET पदव्युत्तर परीक्षा 11 सप्टेंबर 2021 ला घेण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडावीया यांनी मंगळवारी सांगितले.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Embed widget