एक्स्प्लोर

Coronavirus : मुंबईत कॉकटेल अॅन्टीबॉडीजचा प्रयोग यशस्वी; औषधोपचारानंतर मृत्यू दरामध्ये तब्‍बल 70 टक्‍के घट

मुंबईत कॉकटेल अॅन्टीबॉडीजचा प्रयोग यशस्वी. मिश्रि‍त औषधोपचारानंतर मृत्‍यू दरामध्‍ये तब्‍बल 70 टक्‍के घट झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात 200 रुग्णांवर उपचार करण्यात आले.

मुंबई : कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्‍या (मुंबईत कॉकटेल अॅन्टीबॉडीजचा प्रयोग यशस्वी) उपचार पद्धतीनं अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात आतापर्यंत सुमारे 200 पेक्षा अधिक रुग्‍णांवर या पद्धतीने उपचार करण्‍यात आले आहेत. हा प्राथमिक प्रयोग यशस्‍वी ठरला आहे. कारण, हे मिश्रि‍त औषध दिल्‍यानंतर फक्‍त एकाच (0.5 टक्‍के) रुग्‍णास प्राणवायू पुरवठ्याची गरज भासली तर मृत्‍यू दरामध्‍ये तब्‍बल 70 टक्‍के घट झाली आहे. एवढेच नव्‍हे तर रुग्‍णालयातील उपचारांचा कालावधी 13 ते 14 दिवसांवरुन कमी होवून आता 5 ते 6 दिवसांवर आला आहे. 

कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा प्राथमिक प्रयोग अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी करण्‍यात आला आहे. हा प्रयोग अत्‍यंत यशस्‍वी ठरला आहे.

कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी अमेरिकेमध्‍ये नोव्‍हेंबर 2020 पासून कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा उपयोग करण्‍यात येत आहे. अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष  डोनाल्‍ड ट्रम्‍प हे कोरोनाबाधित झाल्‍यानंतर त्‍यांना देखील हेच मिश्रित औषधोपचार देण्‍यात आले होते. त्‍यानंतर त्‍यांच्‍या प्रकृतीमध्‍ये अत्‍यंत वेगाने सुधारणा झाली. भारतामध्‍ये अलीकडेच म्‍हणजे, दिनांक 10 मे 2021 रोजी केंद्रीय औषधी प्रमाणके नियंत्रण संघटनेकडे (Central Drugs Standard Control Organisation मान्‍यता दिली आहे.

कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब ही प्रतिपिंड औषधी (antibodies medicine) आहेत. या दोन्‍ही औषधांचा मिश्रित (cocktail) वापर करुन कोविड बाधितांवर उपचार केले जाऊ शकतात. ज्‍यांचे वय 12 वर्षांपेक्षा अधिक आणि शारीरिक वजन 40 किलोपेक्षा जास्‍त आहे, अशा बाधित रुग्‍णांना हे औषध दिले जाते. सौम्‍य ते मध्‍यम (mild to moderate) स्‍वरुपात ज्‍यांना कोविडची बाधा झाली आहे आणि प्राणवायू पुरवठ्याची गरज नाही, मात्र प्रकृती अधिक बिघडण्‍याचा धोका आहे, अशा गटातील बाधित रुग्‍णांना हे मिश्रित औषधोपचार दिले जातात. महत्‍त्‍वाचे म्‍हणजे, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, दमा आणि त्‍यासारखे श्‍वसनाचे इतर तीव्र आजार, उच्‍च रक्‍तदाब, सिकलसेल, मेंदूविषयक व्‍याधी इत्‍यादी आजार असले तरीही उपचार करणे शक्‍य होते.

Antibody Cocktail treatment : सोलापुरातील बार्शीत अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग यशस्वी, कोरोना रुग्ण 24 तासांत बरे, डॉक्टरांचा दावा

मुंबई महानगरपालिका आरोग्‍य प्रशासनाने ही मिश्रित औषधोपचार पद्धती प्रायोग‍िक तत्‍त्‍वावर प्रारंभी सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात राबविली आहे. आजवर 212 कोविड बाधितांना हे मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्‍यात आले. त्यापैकी 199 रुग्‍णांचे उपचाराअंती निष्‍कर्ष प्राप्‍त झाले आहेत. त्‍याचा सविस्‍तर अभ्‍यास प्रशासनाकडून करण्‍यात येत आहे. 
 
या 199 रुग्‍णांमध्‍ये 18 ते 45 वर्ष वयोगटातील 101 रुग्‍ण, 45 ते 59 वर्ष वयोगटातील 45 रुग्‍ण तर 60 वर्ष वयोगटावरील 53 रुग्‍णांचा समावेश आहे. एकूण 199 पैकी 74 जणांना किमान एक तरी सहव्‍याधी (co-morbidity) आहे. 

हे सर्व 199 रुग्‍ण सौम्‍य ते मध्‍यम बाधा या गटातीलच होते. उपचार सुरु करतेवेळी या 199 बाधितांपैकी 179 जणांना ताप, 158 जणांना तापासह खोकला किंवा ताप नसला तरी खोकल्‍याचा त्रास होत होता. तसेच 4 रुग्‍णांना प्राणवायू (ऑक्‍स‍ि‍जन) पुरवठा करावा लागणार होता. एचआरसीटी चाचणीनुसार वर्गीकरणाचा विचार करता रुग्‍णांचा सरासरी एचआरसीटी स्‍कोअर 25 पैकी 7 ते 8 इतका होता. सर्वाधिक एचआरसीटी स्‍कोअर 25 पैकी 11 इतका होता.
 
निरीक्षणा अंती असे लक्षात आले की, मिश्रित औषध दिल्‍यानंतर अवघ्‍या 48 तासांतच रुग्‍णांना ताप येणे थांबले. 199 पैकी फक्‍त एकाच व्‍यक्‍तीला पुढे प्राणवायू पुरवठा करावा लागला. हे प्रमाण अवघे 0.5 टक्‍के आहे. कोविड बाधितांना एरवी प्राणवायूची भासणारी निकड पाहता, ही बाब मोठा दिलासा देणारी आहे. कारण पहिल्‍या व दुसऱ्या लाटेमध्‍ये किमान 20 टक्‍के रुग्‍णांना प्राणवायू द्यावा लागत होता. तर 5 टक्‍के रुग्‍णांना अतिदक्षता (आयसीयू) उपचार पुरवावे लागत होते. सर्वात महत्‍त्‍वाचे म्‍हणजे कोणत्‍याही रुग्‍णावर या मिश्रित औषधांचे प्रतिकूल परिणाम (साईड इफेक्‍टस्) आढळलेले नाहीत. तसेच मृत्‍यूंचे प्रमाण देखील तब्‍बल 70 टक्‍क्‍यांनी घटले आहे.
 
सदर मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्‍यासाठी एक तासाचा अवधी पुरेसा ठरतो. त्‍या कालावधीत संबंधित रुग्‍णाचे थेट निरीक्षण करता येते. रुग्‍णालयात दाखल करुन न घेता, बाह्य रुग्‍ण सेवा (ओपीडी) पद्धतीने देखील हे औषध देणे शक्‍य आहे. रेमडेसिविर सारखी औषधं आणि स्‍टेरॉईडचा उपयोग टाळून हे मिश्रित औषध देणे शक्‍य असल्‍याने रुग्‍णांना खऱया अर्थाने दिलासा मिळतो आहे. रुग्‍णालयात दाखल होण्‍याची गरज टाळून, प्राणवायू पुरवठा आणि इतर महागड्या औषधोपचारांची आवश्‍यकता भासत नसल्‍याने सदर मिश्रित औषधोपचार आर्थिकदृष्‍ट्या देखील रुग्‍णांना फायदेशीर ठरणारे आहेत. तर वैद्यकीय मनुष्‍यबळाचा विचार करता, रुग्‍णाला ओपीडी तत्‍वावर उपचार पुरवणे शक्‍य असल्‍याने आणि रुग्‍णाचा रुग्‍णालयात राहण्‍याचा कालावधी कमी होत असल्‍याने डॉक्‍टरांवरील कामकाजाचा ताणही निवळण्‍यास मदत होणार आहे.

कोविडच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर अॅन्टीबॉडीज कॉकटेलचा हा प्रयोग यशस्‍वी होत असल्‍याचे प्राथमिक निष्‍कर्ष हाती आल्‍याने महानगरपालिका प्रशासनाने या औषधांचा वापर करता यावा यासाठी पुरेशी तयारी केली आहे. कोविडचा सामना करण्‍यासाठी आरोग्‍य सेवा-सुविधा सुसज्‍ज असताना, तसेच लसीकरणाला वेग दिल्‍यानंतर या नवीन औषधोपचार पद्धतीमुळे मुंबईकर नागरिकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget