एक्स्प्लोर

कोरोना काळात आदिवासी बांधवांना दिलासा; खावटी अनुदान योजनेचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

कोरोना काळात आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला असून खावटी अनुदान योजनेचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला आहे.

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना देऊ केलेले खावटी अनुदान हे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल असल्याचे गौरवोद्गार नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. निमित्त होतं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत खावटी योजनेच्या ऑनलाइन उद्घाटन समारंभाचे. काल (सोमवारी) आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जगभरात सगळ्यांनाच लॉकडाऊन पाळावा लागला. याचा फटका इतर सर्व घटका प्रमाणेच हातावर पोट घेऊन जगणाऱ्या आदिवासी समाजाला देखील बसला, या अवघड काळात राज्यातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी 2013 साली बंद करण्यात आलेली खावटी कर्ज योजना अनुदान स्वरूपात सुरु करण्याचा निर्णय या सरकारने घेतला. 

राज्य सरकारच्या निर्णयानुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्गत गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि भामरागड या दोन प्रकल्प क्षेत्रातील लाभार्थ्यांना काल (सोमवारी) अनुदान वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी प्रातिनिधीक दोन लाभार्थ्यांची नावे घेवून पालकमंत्री यांचे अनुमतीने खावटी योजनेतील अन्नधान्य कीटचे वितरण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, मंत्री महोदयांच्या सूचनेवरून कीट वाटप करण्याचा मान प्रकल्प कार्यालयातील वर्ग-4 मधील महिला कर्मचाऱ्याला दिला. या कार्यक्रमाला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार रामदासजी आंबटकर, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आदिवासी विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे-वर्मा, व्यवस्थापकीस संचालक नितीन पाटील, प्रकल्प अधिकारी भामरागड शुभम गुप्ता, प्रकल्प अधिकारी अहेरी श्री अंकित, जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर आणि विशेष कार्य अधिकारी सुनिल भजनावळे उपस्थित होते.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पुढाकाराने मिळालेल्या या अनुदानाचा गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना निश्चितच फायदा होईल असा विश्वास श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. उत्तम रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा, दळणवळण साधन आणि रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून दिल्यास गडचिरोली जिल्ह्याचा नक्की कायापालट होऊ शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विकास प्रक्रियेत गडचिरोली जिल्ह्यात अनेक अडचणी आहेत परंतु त्यांच्यावर मात करून गडचिरोलीचा विकास हेच उद्दिाष्ट असणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री यांनी यावेळी केले. 

गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून हा जिल्हा इतर जिल्ह्याप्रमाणे मुख्य प्रवाहात आणल्यास तो नक्कीच नक्षलवादापासून मुक्त होऊ शकेल असही त्यांनी बोलताना स्पष्ट केलं. भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातील धान पिकाचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी गोडाऊन उभी करणे तसेच जिल्ह्यातील विजेच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुरेसा निधी दिल्यास या जिल्ह्याचे चित्र बदलण्याच्या दृष्टीने ते निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कार्यक्रमाची प्रस्तावना संचालक नितिन पाटील, प्रकल्प अधिकारी भामरागड शुभम गुप्ता आणि प्रकल्प अधिकारी अहेरी अंकित यांनी केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

राज्य मानवाधिकार आयोगावरील रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Embed widget