एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबादेत संवेदनशील माहितीचा पोरखेळ करणारी टोळी गजाआड
विशेष म्हणजे नुसतं आधारच नाही बरं का, बनावट शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, अपंगांचं ओळखपत्र, बसचा पास हवं ते बनावट प्रमाणपत्र तयार करण्याचा फंडा या टोळीकडे आहे.
औरंगाबाद : आजकाल कोणत्याही व्यवहारासाठी आधार कार्डाची कॉपी देण्याची मागणी आपल्याला संबंधित संस्था, कंपन्यांकडून हमखास केली जाते. मात्र औरंगाबादेत जो प्रकार घडला, तो पाहून आपण नक्कीच अधिक सतर्क होणं गरजेचं आहे.
महासंगणकानं जरी प्रयत्न केले, तरी आधारच्या सॉफ्टवेअरशी छेडछाड करायला ब्रह्मांडाच्या वयापेक्षा जास्त वेळ लागेल, असा दावा सरकार सुप्रीम कोर्टात करतं. पण हा आत्मविश्वास म्हणजे फाजिलपणा असल्याचं औरंगाबादच्या टोळक्यानं सिद्ध करुन दाखवलं आहे.
या त्रिकुटानं चुटकीसरशी आधारकार्ड तयार करुन सरकार आणि आधारच्या यंत्रणेसमोर नवं आव्हान उभं केलं. हवा तो आधार नंबर टाका, हवा तो पत्ता टाका झालं तुमचं आधारकार्ड तयार. विशेष म्हणजे नुसतं आधारच नाही बरं का, बनावट शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, अपंगांचं ओळखपत्र, बसचा पास हवं ते बनावट प्रमाणपत्र तयार करण्याचा फंडा या टोळीकडे आहे.
जिल्ह्यातील बहुतेक शासकीय कार्यालयांचे शिक्के या टोळीकडे सापडले. बरं प्रत्येक कागदपत्राचे रेट ठरलेले आहेत.
आधारकार्डासाठी 700 रुपये
शिधापत्रिकेसाठी एक हजार
जात प्रमाणपत्र पाच हजार
अपंगासांठीचा एसटी पास 1 हजार
मतदान कार्ड 500 रुपये
रात्र रात्र रांगेत थांबून लोकांनी आधार कार्ड काढली. डोळ्याचे, बोटांचे ठसे आणि त्यासह सगळी संवेदनशील माहिती सरकारच्या हवाली केली. त्याचा असा खुलेआम बाजार सुरु आहे. त्यामुळे आधार कार्ड खरंच किती युनिक आहे याचा विचार सरकारी यंत्रणांनी वेळीच केला तर मोठा धोका तुमच्या-आमच्यासमोर उभा असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement