एक्स्प्लोर
नगरपालिका निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपचं वर्चस्व
भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकांत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. ६ पैकी ४ नगरपालिकांमध्ये भाजपनं विजय मिळवला आहे.
मुंबई : भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकांत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. ६ पैकी ४ नगरपालिकांमध्ये भाजपनं विजय मिळवला आहे. तर एका जागेवर राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
या नगरपालिका निवडणुकीत मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच धुळधाण उडाली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा मतदार संघ असलेल्या जामनेरमध्ये सर्वच्या सर्व २४ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
कणकवलीत नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे १० नगरसेवक निवडून आले आहेत. तर ३ जागा भाजपने मिळवल्या आहेत. एकूण ६ नगरपालिकांतील ११५ जागांपैकी ५७ जागी भाजपचे नगरसेवक विजयी झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement