एक्स्प्लोर

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंच्या नावाखाली आक्षेपार्ह शब्द, गृहमंत्र्यांकडून दखल

भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर भाजपच्या महाराष्ट्रातील खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला असल्याचं निदर्शनास आल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.

मुंबई : भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला ट्वीट करत तत्काळ कार्यवाही करा, अन्यथा सायबर सेल पुढील कारवाई करेल असं सांगितलं आहे.

BJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट आहे. या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या रक्षा खडसे यांच्या नावापुढे कोणताही आक्षेपार्ह उल्लेख दिसत नाहीये. तो आक्षेपर्ह उल्लेख तत्काळ हटवण्यात आला आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांची यादी या वेबसाईटवर आहे. जेव्हा रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हा सर्व प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, स्वाती चतुर्वेदी यांनी ट्वीट केल्यानंतर लगेचच या प्रकरणाची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. त्याचप्रमाणे रक्षा खडसे यांनी एबीपी माझाला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी सर्व प्रकारासंदर्भात पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केल्याचं म्हटलं आहे. तसेच हा सर्व प्रकार माझी बदनामी करण्यासाठीही कोणीतरी फोटोशॉप करुन केलेला असावा, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचं ट्वीट :

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, "भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसेजी यांचं अपमानजनक वर्णन पाहून धक्का बसला. अशाप्रकारे महिलांचा अपमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपनं दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करेल."

सर्व प्रकरणावर खासदार रक्षा खडसे यांनी एबीपी माझाला दिलेली पहिली प्रतिक्रिया :

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, "ज्यावेळी मला यासंदर्भात माहिती मिळाली. तेव्हा मी वेबसाईट चेक केली. त्यावेळी असा कोणताही उल्लेख माझ्या नावासमोर नव्हता. ज्या लोकांकडून हे व्हायरल झालं आहे, ते पेज सेव्ह महाराष्ट्र फॉर बीजेपी असं आहे. याच पेजवरुन यासर्व गोष्टी व्हायरल होत आहेत. कदाचित माझी बदनामी करण्यासाठीही कोणीतरी फोटोशॉप करुन हे केलेलं असावं, अशी माझी शंका आहे. मी एसपींना यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच पक्षालाही कळवलेलं आहे. त्यामुळे खरं नक्कीच पुढे येईल." यासंदर्भता काही तक्रार करणार का, असं विचारल्यावर रक्षा खडसे म्हणाल्या की, "माझं यासंदर्भात काल एसपींसोबत बोलणं झालेलं आहे. ते देखील याप्रकरणी माहिती घेत आहेत. पण सध्या सोशल मीडियाचं जग एवढं मोठं झालेलं आहे, तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं आहे. त्याचा वापर करुन एखादी खोटी गोष्टही खरी केली जाते. मला शंका आहे की, फोटोशॉप करुनच या गोष्टी करण्यात आल्या आहेत."

काय आहे प्रकरण?

पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी भाजपच्या वेबसाईटवरील खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखालील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट ट्विटरवर शेअर केला आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना टॅग करत, वेबसाईट कोण चालवतं? असा सवाल विचारला. या प्रकरणाची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली असून कार्यवाहीची मागणी केली आहे. सध्यातरी भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेख हा हटवण्यात आला आहे. त्यामुळे हा तांत्रिक घोळ होता की, कोणी जाणून बुजून केलं होतं, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget